Drought Update : पीककर्जाचे व्याज, शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे

Drought Condition : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने एक वर्षाचे पीक कर्जाचे व्याज व शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे.
Crop Loan
Crop LoanAgrowon
Published on
Updated on

Satara News : दुष्काळाच्या पार्श्‍वभूमीवर शासनाने एक वर्षाचे पीक कर्जाचे व्याज व शेतीपंपांचे वीजबिल माफ करावे, अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांतून होऊ लागली आहे. दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकऱ्यांना यावर्षी अपेक्षित उत्पादन मिळालेले नाही. तर रब्बी हंगामही अडचणीत आहे.

या पार्श्वभूमीवर शासनाने काढलेल्या दुष्काळी उपाययोजनांमध्ये पीक कर्जाचे पुनर्गठन करावे, असे म्हटले आहे; पण याबाबत कोणत्याही मार्गदर्शक सूचना बॅंकांना आलेल्या नाहीत. वीजबिलाच्या वसुलीलाही तात्पुरती स्थगिती दिली आहे.

Crop Loan
Drought Crisis : उजनी पाणलोट क्षेत्रावर दुष्काळाचे सावट

त्यामुळे हा तात्पुरता दिलासा आहे. त्यातून मुक्तता करून एक वर्षाचे पीक कर्जाचे व्याज व शेतीपंपांचे वीजबिल माफ करण्याची गरज आहे. यावर्षी पावसाने दडी मारली. अल्प पावसामुळे खरिपाचे उत्पन्न ५० टक्क्यांपेक्षा अधिकने घटले. त्यामुळे शेतकरी सध्या अडचणीत आहे.

पुरेसा पाऊस नसल्याने विहिरी, नदीत अल्प पाणीसाठा आहे. सध्या ओढे नाले, कोरडे आहेत, तर विहिरींनी आताच तळ गाठला आहे. त्यामुळे रब्बीच्या पिकांना आगामी काळात पाणी मिळणार नाही. परिणामी, उत्पन्नात प्रचंड घट होणार आहे.

Crop Loan
Drought Management : दुष्काळ, पशुधन अन् ग्रामपंचायतीचे कार्य

यावर्षीचे दोन्ही हंगाम अडचणीचे झाल्याने शेतकऱ्यांकडे पुरेसे पैसे नाहीत. पीककर्जाचे पुनर्गठन करताना व्याज आणि मुद्दल एकत्र करून ते तीन टप्प्यांत भरण्याची मुभा दिली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना पीक कर्जाचे पैसे आज ना उद्या भरावेच लागणार आहेत.

त्यामुळे हा तात्पुरताच दिलासा आहे; त्यामुळे दुष्काळात शेतकऱ्यांना पूर्ण दिलासा देण्यासाठी शासनाने आगामी मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांना पीक कर्जाला व्याजमाफी जाहीर करावी. तसेच शेतीपंपांचे यावर्षाचे वीजबिल पूर्ण माफ करण्याबाबतचा निर्णय घ्यावा, तरच शेतकऱ्यांना दुष्काळात दिलासा दिल्यासारखे होईल, अशी शेतकऱ्यांची मागणी आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com