Crop Insurance Refund : नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना १७९ कोटींचा पीकविमा परतावा

Refund Distribution Update : पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत दोन लाख ५४ हजार ३३३ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६१ लाख रुपयांचा परतावा मंजूर आहे.
Crop Insurance
Crop InsuranceAgrowon
Published on
Updated on

Nanded News : पंतप्रधान पीकविमा योजनेतील स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत दोन लाख ५४ हजार ३३३ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६१ लाख रुपयांचा परतावा मंजूर आहे. हा परतावा वाटपाची कारवाई सुरू आहे. शिल्लक असलेल्या एक लाख ४१ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११९ कोटी रुपये लवकर जमा होणार असल्याची माहिती कृषी विभागाने दिली.

नांदेड जिल्ह्यात खरीप हंगाम २०२३-२४ मध्ये पंतप्रधान पीकविमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी विमा भरला होता. अशा शेतकऱ्यांचे स्थानिक नैसर्गिक आपत्ती घटकाअंतर्गत झालेल्या नुकसानीबाबत भरपाई देण्याच्या सूचना दिल्या होत्या. यानुसार ज्या शेतकऱ्यांनी नुकसानीसंदर्भात पूर्वसूचना (दावे) दिल्या, अशा दोन लाख ५४ हजार ३३३ शेतकऱ्यांना १७८ कोटी ६१ लाख रुपयांचा परतावा मंजूर झाला आहे.

Crop Insurance
Crop Insurance Bharpai : पीकविमा योजनेतून कंपन्यांना डच्चू देणार ? पीकविमा योजनेत कंपन्यांच्या कामावर राज्यांचा आक्षेप

हा परतावा सध्या पीकविमा कंपनीकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटपाची प्रक्रिया पीकविमा पोर्टलच्या माध्यमातून सुरू आहे. हा पीकविमा आधार प्रणालीशी जोडलेल्या बँक खात्यांमध्ये जमा होत असल्याची माहिती कृषी विभागाने दिली. आजपर्यंत एक लाख ४१ हजार ५७५ शेतकऱ्यांच्या खात्यावर ११९ कोटी रुपये जमा झाले आहेत.

उर्वरित पीकविमा वाटपाची कारवाई लवकर पूर्ण करण्याची सूचना विमा कंपनीला दिली आहे. ही विमा भरपाई वाटपाची कारवाई पूर्ण होऊन देखील नुकसान भरपाई मिळाली नसल्यास विमा कंपनीच्या तालुकास्तरावरील कार्यालयास भेट द्यावी, असे आवाहन कृषी विभागाने शेतकऱ्यांना केले आहे. दरम्यान, अनेक शेतकऱ्यांनी आम्ही पण, दावे दाखल केले, परंतु परतावा मिळाला नसल्याच्या तक्रारी कृषी विभागाकडे केल्या आहेत. याबरोबरच जिल्ह्यात १ ऑगस्टपासून ई-पीकपाहणी मोहिमेअंतर्गत पीक पेरा नोंदणीचे काम सुरू आहे. परंतु पेरा नोंदणीचे काम संथगतीने सुरू आहे.

Crop Insurance
Crop Insurance Refund : पिककापणी प्रयोगाआधारित ६३ कोटींवर विमा परतावा मंजूर

आजपर्यंत पाच टक्केही शेतकऱ्यांनी ॲपवर पेरा नोंदणी केली नाही. पेरा नोंदणीची मुदत १५ सप्टेंबर असल्याने या कामाला गती आली नसल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. तर दुसरीकडे जे शेतकरी पेरा नोंदणी करत आहेत. त्यांना अडचणींना सामना करावा लागत आहे. अनेक ठिकाणी पेरा नोंदणीचे ॲप चालत नाही. ॲप सुरू झाले तरी पिकांची माहिती पूर्ण भरल्यानंतर ते सेव्ह होत नाही. पेरा नोंदणीची माहिती इतर मोबाइल नंबरवर पाठविण्यात आल्याचे संदेश येत आहेत. त्यामुळे पेरा नोंदणी होत नसल्याची माहिती शेतकरी देत आहेत.

आमच्या गावात नुकसानीबाबत दावे दाखल केलेल्या दहा टक्के शेतकऱ्यांनाही भरपाई मंजूर झाली नाही. एकाच गटात नुकसान झाल्याचे कळवूनही एक-दोघांचा दावा मंजूर झाला, परंतु त्याच गटातील इतरांनी दावा करूनही त्यांना विमा मिळाला नाही.
अजित अटकळीकर, शेतकरी, रा. अटकळी, ता. बिलोली. जि. नांदेड
ई-पीकपाहणी ॲपवर माहिती अपलोड होत नाही. पिकांची माहिती पूर्ण भरल्यानंतर ते सेव्ह होत नाही. इतर मोबाइलवर ते पाठविल्याचे संदेश येत आहेत.
सज्जन मुर्ताजी शिंदे, शेतकरी, जोमेगाव, ता. लोहा, जि. नांदेड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com