Green Revolution : हरितक्रांती घडविणाऱ्या वसंतरावांच्या गावातच नापिकी

vasantraon Naik : गहूलीचे सुपुत्र असलेल्या (कै.) वसंतराव नाईक या महामानवाच्या प्रयत्नामुळे राज्यात हरितक्रांती आली.
Vasantrao Naik Village
Vasantrao Naik Village Agrowon
Published on
Updated on

Yavatmal News : गहूलीचे सुपुत्र असलेल्या (कै.) वसंतराव नाईक या महामानवाच्या प्रयत्नामुळे राज्यात हरितक्रांती आली. त्याचा जन्मदिवस संपूर्ण राज्यात कृषिदिन म्हणून साजरा होत असताना त्यांच्याच गावात याच दिवशी एका शेतकऱ्याने आत्महत्या करून तेरा दिवस झाले होते. या शेतकऱ्याने नापिकी, कर्जबाजारीपणाला कंटाळत आत्महत्या केली होती.

गहुली गाव राज्याला हरितक्रांतीची वाट दाखविणाऱ्या वसंतराव नाईक यांचे जन्मगाव (ता. पुसद) आहे. त्याच गावात नापिकीने शेतकऱ्यांची चिंता वाढली असून गेल्या दोन महिन्यांत दोन शेतकरी आत्महत्यांची नोंद झाली. त्यातील म्हस्के यांची आत्महत्या १३ दिवसांपूर्वी झाली. त्यांच्या पत्नी वर्षा म्हस्के यांनी दिलेल्या माहितीनूसार, कुटुंबाची अवघी तीन एकर जमीन.

Vasantrao Naik Village
Agriculture Advice : शेतकऱ्यांच्या अनुभवाला देऊ शास्त्राची जोड

त्यात सोयाबीन, तूर घ्यायचो. अतुल, जगदीश ही दोन मुले शेतीत राबत होती. यातून मजुरीचा खर्च कमी करण्यावर भर दिला जात होता. परंतु गेल्या काही वर्षात उत्पादकता आणि खर्चाचा ताळेबंद काही जुळला नाही. यातूनच बॅंक कर्जाचा भरणा न झाल्याने ते थकीत राहिले आणि पुढे शेतीसाठी खासगी कर्जाची उचल करावी लागली.

Vasantrao Naik Village
Agriculture Department : फळरोपे, कलमांची दरवाढ

त्यातूनही गरज भागली नाही म्हणून वर्षा म्हस्के ज्या महिला गटात आहेत, त्या गटातून ४५ हजार रुपयांची उचल केली. या साऱ्यापायी कर्जाचा डोंगर वाढत तीन ते चार लाखांवर पोचला. त्याच्या चुकाऱ्याचे काय, अशा विवंचनेत संजय पडले आणि कोणताच मार्ग न दिसल्याने नैराश्‍यातून आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले.

‘तीन वर्षांपासून पीक साधलंच न्हाई’

‘‘गेल्या दोन तीन वर्षांपासून पीक साधलंच न्हाई. यंदाबी दुबार पेरणी करावी लागली. आदीच बॅंकेचं, गटाचं आणि सावकाराचं कर्ज होतं. ते तीन ते चार लाखावर गेलं अन हे कर्ज फेडाची चिंता लागली. याच चिंतेने माझ्या कपाळावरच कुकु पुसले,’’ असे हे सांगतानाच वर्षा म्हस्के यांचे डोळे अश्रूंनी भरून आले होते.

पाच जिल्ह्यांत जमिनी शोधण्यास लावून कुरण विकास कार्यक्रम राबविणार आहे. चारा मोफत देऊ. याव्दारे दूध-दुभत्यात स्वयंपूर्ण करू. पीकविमा योजना प्रभावी राबविण्याचे आदेश दिले आहेत. तसेच इतरही उपक्रमातून आत्महत्या कशा कमी होतील, यावर भर दिला जाईल.
- ॲड. नीलेश हेलोंडे, अध्यक्ष, वसंतराव नाईक शेती स्वावलंबन मिशन

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com