Electronic Soil : इलेक्ट्रॉनिक माती मुळे पिकाची वाढ होणार दुप्पट

Hydroponic Farming : नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक म्हणतात. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये ज्याप्रकारे मातीविना रोपे वाढविली जातात. तीच पद्धत इलेक्ट्रॉनिक माती मध्ये वापरली आहे.
Electronic Soil
Electronic SoilAgrowon

E-Soil : दिवसेंदिव शेतीमध्ये नवनविन तंत्रज्ञानाचा वापर वाढताना दिसतोय. काळ बदलतोय तसा शेती करण्याच्या पद्धतीही बदलत आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञानाने पारंपारिक शेतीमध्ये असे अनेक बदल केले आहेत ज्यामुळे शेतीची कामे सोपी आणि सोयीस्कर झाली आहेत. यातील एक महत्वाचा बदल म्हणजे मातीविना शेती. आतापर्यंत आपण हायड्रोपेनिक्स शेती, एरोपोनिक्स शेती बद्दल ऐकल होत. बऱ्याच शेतकऱ्यांनी याप्रकारची शेती करायला सुरुवातही केली आहे.

पण इलेक्ट्रॉनीक मातीमध्ये केली जाणारी शेती तुम्ही कधी ऐकली आहे का? स्विडन देशातील लिंकपिंग विद्यापीठा च्या शास्त्रज्ञांनी इलेक्ट्रॉनीक माती म्हणजेच ई सॉइल तयार केली आहे. या मातीमध्ये पिकाला अवश्यक असणारे अन्नद्रव्ये आहेत जी रोपाची वाढ जास्त जोमाने करतात. यामध्ये पिकाची वाढ १५ दिवसातच ५० टक्क्यांपर्यंत होत असल्याच दावा शास्त्रज्ञांनी केला आहे.

ई- सॉइल कसं काम करते?

नियंत्रित हवामानात मातीशिवाय वनस्पती वाढवण्याच्या तंत्राला हायड्रोपोनिक म्हणतात. हायड्रोपोनिक्स शेतीमध्ये ज्याप्रकारे मातीविना रोपे वाढविली जातात. तीच पद्धत इलेक्ट्रॉनिक माती मध्ये वापरली आहे. म्हणजे यामध्ये मिनरल न्युट्रीयंट सोल्युशनमध्ये विज प्रवाह सोडून पिकाला अन्नद्रव्ये उपलब्ध करुन दिली जातात त्यामुळे रोपांची वाढ जोमाने होते.

पिकांना एका विशिष्ट प्रकारच्या सबस्ट्रेटवर लावलं जातं. या सबस्ट्रेटमध्ये वीज प्रवाहित करून त्याला अ‍ॅक्टिव्हेट केलं जातं. यामुळे रोपं वेगाने मुळांमधून पोषक द्रव्ये शोषून घेतात. यामुळे पिकाची वाढ वेगाने होते.

Electronic Soil
Electronic Technology : इलेक्ट्रॉनिक आश्‍चर्ये

१५ दिवसात ५० टक्के वाढ

पारंपारिक पद्धतीने केल्या जाणाऱ्या शेतीत पिकाला खतामार्फत जी अन्नद्रव्ये पुरविली जातात ती पिकाला मिळतीलच असे नाही. कारण अन्नद्रव्य उपलब्धतेवर जमिनीची सुपिकता, पाण्याची उपलब्धता, वातावरण हे घटक परिणाम करतात.

पण या तंत्रामध्ये मिनरल न्युट्रीयंट सोल्युशनमध्ये विज प्रवाह सोडून अन्नद्रव्ये पिकाला उपलब्ध करुन दिली जातात. त्यामुळे १५ दिवसातच रोपे ५० टक्क्यांनी वाढतात.

हे संशोधन जागतिक हवामान बदलाचा विचार करुन करण्यात आले होते. पूर्वीच्या संशोधनामध्ये मुळांना उत्तेजित करण्यासाठी जास्त व्होल्टेजचा वापर केला गेला होता. पण ई-सॉइलचा फायदा असा आहे की, त्यात खूप कमी ऊर्जेचा वापर केला आहे. त्यामुळे पिकाला जास्त-व्होल्टेज चा धोका राहत नाही.

या तंत्राचा वापर करुन बार्ली रोपांची लागवड करण्यात आली. विद्युत प्रवाहामुळे बार्ली रोपांची चांगली वाढ झाली. असं अभ्यासातून दिसून आल आहे. या तंत्राचा वापर करून कमी जागेत, इमारतीच्या छतावर, जमिनीची कमतरता असलेल्या ठिकाणी शेती सहज करता येते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com