Electronic Technology : इलेक्ट्रॉनिक आश्‍चर्ये

‘हॅरिटोरा एक्स वायरलेस’ हा संपूर्ण शरीरावर घालता येण्याजोगे ट्रॅकिंग उपकरण पॅनासोनिक कंपनीने सादर केले आहे. आभासी तंत्रज्ञानातील हा पुढील आविष्कार मानला जातो.
Electronic Technology
Electronic TechnologyAgrowon

अमेरिका : नेवाडा येथील लास वेगास शहरामध्ये गेल्या महिन्यामध्ये कन्झ्युमर इलेक्ट्रोनिक्स शो (Electronics Show) पार पडला या प्रदर्शनामध्ये तंत्रज्ञानविषयक विविध ३१०० कंपन्यांनी आपली आधुनिक नावीन्यपूर्ण उत्पादने सादर केली.

हे जगातील सर्वांत मोठा वार्षिक तंत्रज्ञान आणि व्यापारविषयक प्रदर्शन (Exhibition) असल्याचा आयोजकांचा दावा आहे. या प्रदर्शनाला दरवर्षी एक लाखापेक्षा अधिक लोक भेट देतात.

‘हॅरिटोरा एक्स वायरलेस’ हा संपूर्ण शरीरावर घालता येण्याजोगे ट्रॅकिंग उपकरण पॅनासोनिक कंपनीने सादर केले आहे. आभासी तंत्रज्ञानातील हा पुढील आविष्कार मानला जातो.

‘ओव्हीआर टेक्नॉलॉजी’ या कंपनीने ‘इऑन ३’ (ION 3) हा गंध तंत्रज्ञानावर आधारित एआर गॉगल बाजारात आणला आहे. त्यातून आभासी दृश्याप्रमाणे योग्य ते गंधही सोडले जातात.

त्यासोबत जोडलेल्या गंधांच्या कार्टिजमध्ये हजारो वैशिष्ट्यपूर्ण गंध, वास यांचे मिश्रण तयार करण्यासाठी क्षमता आहे. त्यामुळे या गॉगलमधून आभासी जगाचा प्रत्यक्षाप्रमाणे अनुभव घेता येणार आहे. उदा. आभासी जगामध्ये गुलाबाचे दृश्य असेल, तर गुलाबाचा सुवास येईल.

Electronic Technology
Agriculture Exhibition : नवीन तंत्रज्ञान जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांची कृषी प्रदर्शनात गर्दी

‘युनिट्री बी१’ हा रोबोट एखाद्या कुत्र्याप्रमाणे चालत, धावत दूरपर्यंत लक्ष ठेवू शकतो.

‘होलोन मूव्हर’ हे कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणारे स्वयंचलित सार्वजनिक वाहन.

‘दि लाइटइयर ०’ ही संपूर्णपणे सौरऊर्जेवर चालणारी कार आहे. सध्या इलेक्ट्रिक कारचे प्रमाण वाढत असताना त्यांच्या चार्जिंगची समस्या जाणवते, त्यावर सौरऊर्जेतून मार्ग काढण्यात आलेला आहे.

एखाद्याचे आयुष्य वाचवण्याचे कामही आता आधुनिक यंत्रे करणार आहेत. या प्रदर्शनामध्ये ‘यू सेफ’ हे रिमोट कंन्ट्रोलद्वारे कार्यान्वित होणारे लाइफ जॅकेट सादर करण्यात आले आहे.

‘रिचटेक रोबोटिक्स’ने विकसित केलेल्या ‘ॲडम’ या बारटेंडर रोबोटच्या हातांची रचना वैशिष्ट्यपूर्ण आहे. त्यामुळे तो चहा किंवा कोणतेही द्रव्य न सांडता योग्य त्या मापामध्ये सर्व्ह करू शकतो.

‘एओलस रोबोटिक्स’ (Aeolus Robotics) या कंपनीचा ‘एओ’ हा दोन हातांनी विविध कामे करणारा रोबोट प्रदर्शनामध्ये प्रात्यक्षिक म्हणून एलेव्हेटरची बटणे दाबत असताना.

‘शेनझेन एन्जॉयकूल टेक्नोलॉजी’ कंपनीच्या प्रतिनिधी सुरी ली या एन्जॉयकूल पोर्टेबल आउटडोअर एअर कंडिशनर दाखवत असताना. हा एअर कुलर ६.५ किलो वजनाचा असून, बॅटरीवर पाच तास चालतो.

‘अॅटमोसगीअर’ (AtmosGear) या कंपनीचे दैनंदिन कामासाठी फिरण्यायोग्य इलेक्ट्रिक इनलाइन स्केट्स. त्यांचा वेग २० मैल प्रति तास आहे.  त्याच्या रिमोट कंन्ट्रोलची रेंज २० मैल इतकी असून, त्याद्वारे चालवता येतात.

‘मेरोपी’ या कंपनीचा ‘सेंटीव्ही’ हा स्वयंचलित कृषी यंत्रमानव. हा वजनाने हलका रोबोट वैशिष्ट्यपूर्ण पायाच्या रचनेमुळे शेतातील चढ-उताराच्या कठीण किंवा भुसभुशीत मातीतून, पिकातून  फिरताना तणे, किडी, रोग यांचा प्रादुर्भाव यांचा शोध घेतो.

Read the latest agriculture news in Marathi and watch Agriculture videos on Agrowon. Get the latest updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Agriculture Jugad, and Farmer Success Stories.

ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
document.addEventListener("qt-page-data", (e) => { console.log(e.detail); })
Agrowon
agrowon.esakal.com