Agriculture Loss: झालेल्या पीक नुकसानीचे नव्याने सर्वेक्षण करून पंचनामे करण्यात येतील आणि संबंधित ग्रामस्थ व शेतकऱ्यांना मदत दिली जाईल, असे लेखी आश्वासन तहसीलदारांनी दिल्यानंतर गोदापात्रात सुरू असलेले जलसमाधी आंदोलन अखेर मंगळवारी (ता. १४) दुपारी मागे घेण्यात आले..ग्रामस्थांना मदत मिळावी तसेच चुकीचे पंचनामे करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, या मागणीसाठी सोमवारी (ता. १३) सकाळी नऊ वाजल्यापासून युवा शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने गुंज बुद्रुक (ता. घनसावंगी) येथील गोदापात्रात जलसमाधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली होती. अधिकारी आंदोलनाकडे न फिरकल्याने मंगळवारी (ता. १४) दुपारपर्यंत आंदोलन सुरूच होते..Rain Crop Damage Survey: आठ दिवसांत केवळ चार गावांचीच माहिती संकलित.माहितीनुसार, सप्टेंबर २०२५ मध्ये झालेल्या अतिवृष्टी, ढगफुटी व महापुरामुळे अनेक घरांची पडझड झाली. शेतातील विहिरींमध्ये गाळ साचला, तर काही विहिरी ढासळल्या. मात्र, या शेतकऱ्यांना मदत न मिळता अधिकारी व कर्मचाऱ्यांनी खोटे पंचनामे करून इतरांच्या खात्यावर मदत जमा केल्याचा आरोप करण्यात आला आहे. त्यामुळे खरे लाभार्थी अनुदानापासून वंचित राहिले..Crop Damage Survey: गांजपूर, चिंचपूर धारूर शिवारातील नुकसानीचे महसूल प्रशासनाकडून पंचनामे.सोमवारपासून रखरखत्या उन्हात शेतकरी व ग्रामस्थ नदीपात्रातील पाण्यात उतरून आंदोलन करत होते. प्रशासनाचे अधिकारी आंदोलनस्थळी न पोहोचल्याने सोमवारी रात्री अंधारातही आंदोलन सुरूच ठेवण्यात आले. गुंज बुद्रुक गावात झालेल्या या आपत्तीमध्ये मोठे नुकसान होऊनही योग्य पंचनामे न झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. वंचित राहिलेल्या शेतकरी व ग्रामस्थांना तत्काळ मदत द्यावी, या मागणीसाठी शेकडो कार्यकर्त्यांनी गोदावरीच्या पात्रात उतरून जलसमाधी आंदोलन केले. सोमवारी सुरू झालेले हे आंदोलन मंगळवारीही सुरू होते..दरम्यान, ग्रामपंचायत पोटनिवडणुकीच्या कार्यक्रमाचा शेवटचा दिवस असल्याने निवडणुकीची कामे मोठ्या प्रमाणात होती. त्यामुळे आंदोलनस्थळी त्वरित पोहोचता आले नाही, असे तहसीलदार रमेश पागोटे यांनी सांगितले. मंगळवारी दुपारनंतर तहसीलदारांनी घटनास्थळी येऊन लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.