Crop Damage : पावसामुळे मोताळा तालुक्यात १५० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

Buldana Rain : वादळी पावसामुळे तालुक्यात आव्हा शिवारात सुमारे १६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले.
Crop Damage
Crop Damage Agrowon

Buldana News : वादळी पावसामुळे तालुक्यात आव्हा शिवारात सुमारे १६२ हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यंत्रणांनी शुक्रवारी (ता. ५) बांधावर जाऊन नुकसानीची पाहणी केली. याबाबत महसूल व कृषी विभागाला अहवाल देण्यात आला असून पंचनामे करण्यात येणार आहेत.

गुरुवारी (ता. चार) आव्हा शिवारासह परिसरात सोसाट्याचा वारा व पावसामुळे शेतातील पिकांचे नुकसान झाले. गहू, मका, ज्वारी, हरभरा, तूर व इतर पिकांसह चाऱ्याचे अतोनात नुकसान झाले. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने बळीराजा हतबल झाला.

Crop Damage
Crop Damage Compensation : पीक नुकसान मदतीसाठी २९६ कोटी रुपयांवर निधी अपेक्षित

नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी २५ हजार रुपयांची आर्थिक मदत द्यावी. अन्यथा शिवसेना स्टाइलने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा युवासेना (उबाठा) जिल्हा उपप्रमुख शुभम घोंगटे पाटील यांनी प्रशासनाला दिला होता.

दरम्यान, मंडळ अधिकारी बी. आर. जाधव, तलाठी पी. एन. वाठोरे, कृषी सहायक प्रवीण उदयकार, सरपंच स्वप्नील घोंगटे यांनी शुक्रवारी (ता. ५) शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन नुकसानाची पाहणी केली.

Crop Damage
Cotton Crop Damage : मॉन्सूनोत्तर पावसामुळे ५० हजार हेक्टरवरील कपाशीचे नुकसान

या वेळी आव्हा शिवारात जवळपास १६२ हेक्टर क्षेत्रातील पिकांना वादळीचा फटका बसल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. याबाबत महसूल व कृषी विभागाला अहवाल देण्यात आला असून, लवकरच पीक नुकसानाचे पंचनामे केले जाणार असल्याची माहिती आहे.

पीक नुकसानाचा हा प्राथमिक अंदाज असून, पंचनामे झाल्यावर वास्तविक आकडेवारी स्पष्ट होणार आहे. या वेळी सरपंच स्वप्नील घोंगटे, ग्रामपंचायत सदस्य पंजाबराव पाटील, राजेंद्र पाटील, माणिकराव पाटील, परमेश्वर पाटील, गोवर्धन घोंगटे, विकास घोंगटे, भाऊराव सुरडकर आदी शेतकऱ्यांची उपस्थिती होती.

आव्हा शिवारातील पीक नुकसानाची पाहणी करण्यात आली असून, महसूल व कृषी विभागाला अहवाल देण्यात आला आहे. सध्या नुकसानाचा प्राथमिक अंदाज घेण्यात आला आहे.
-पी. एन. वाठोरे, तलाठी, आव्हा ता. मोताळा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com