Khandesh Rain Update : पावसाने खानदेशात पिकांची वाताहात

काही भागात तुरळक पाऊसही झाला. काढणी, मळणीची कामे ठप्प आहेत. शेतकरी चिंतेत असून, भरपाईची मागणी केली जात आहे.
Rain Update
Rain Update Agrowon

Jalgaon News : खानदेशात मंगळवार (ता.१४) ते गुरुवार (ता.१६) यादरम्यान झालेल्या वादळी पावसात सुमारे एक हजार हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे. जळगाव जिल्ह्यातील चोपडा, पाचोरा, भुसावळ, तसेच अमळनेर तालुक्यात अधिकचे नुकसान (Crop Damage) झाले आहे.

खानदेशात मंगळवारी व बुधवारी (ता. १५) मध्यरात्रीनंतर वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या अवकाळी पावसामुळे गहू, हरभरा, मका, कांदा यासह फळबागांनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यात सर्वाधिक १९ गावांत झाले आहे. तसेच धुळ्यात एकूण २०० हेक्टर आणि नंदुरबारातही सुमारे २६० हेक्टरवरील पिकांची हानी झाली आहे.

Rain Update
Vidarbha Rain Update : विदर्भावर गारपिटीचे संकट

जळगाव जिल्ह्यात १५ ते १६ मार्चदरम्यान झालेल्या अवकाळी पावसामुळे ५६२ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज कृषी विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना सादर केला आहे. यात हरभरा, बाजरी, गहू, मका व ज्वारी या पिकांचा समावेश आहे.

जळगाव, भुसावळ, जामनेर, अमळनेर, पारोळा, एरंडोल, चोपडा या तालुक्यांत एकूण ४६ गावे बाधित झाले असून, ६२६ शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे. केळी, लिंबू पिकांची काही प्रमाणात नुकसान झाल्याचे अहवालात म्हटले आहे.

पावसाची हजेरी सुरूच

खानदेशात बुधवारीदेखील सर्वत्र पावसाळी वातावरण व हलके वादळ अशी स्थिती होती. बुधवारी रात्री व गुरुवारी दुपारी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे गहू, हरभरा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये मोठी भीती पसरली आहे.

पावसाच्या हजेरीमुळे जळगाव, चोपडा, अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समितीतील धान्य व्यापाऱ्यांना इतरत्र हलवावे लागले. शुक्रवारी (ता.१७) देखील सकाळी ढगाळ व पावसाळी वातावरण होते.

काही भागात तुरळक पाऊसही झाला. काढणी, मळणीची कामे ठप्प आहेत. शेतकरी चिंतेत असून, भरपाईची मागणी केली जात आहे.

Rain Update
Nashik Rain Update : पाऊस ठरतोय सुगीच्या दिवसांत ‘काळ’

संपापामुळे पंचनामे करण्यात अडचणी...

राष्ट्रीय पेन्शन योजना (एनपीएस) रद्द करून जुनी पेन्शन (ओपीएस) योजना पूर्वलक्षी प्रभावाने लागू करावी आणि इतर मागण्यांसाठी कमाल शासकीय कर्मचारी संपावर गेले आहेत. या संपाचा गुरुवारी (ता. १६) तिसरा दिवस होता.

संपात कृषी विभागाचेही कर्मचारी सहभागी झाल्याने गेल्या दोन दिवसांपासून होत असलेल्या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे कोण करणार, असा प्रश्‍न कृषी अधिकाऱ्यांसमोर उभा आहे. याबाबत शेतकऱ्यांमध्ये संतापही वाढत आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com