Crop Damage : नाशिकमध्ये अतिवृष्टीमुळे पिकांची दाणादाण

Heavy Rain Crop Loss : द्राक्ष बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढता असून घड जिरण्याचे प्रमाण वाढत आहे. तर पिके, भाजीपाला पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे.
Crop Damage
Crop DamageAgrowon
Published on
Updated on

Nashik News : जिल्ह्यात अनेक ठिकाणी गुरुवारी (ता. १०) दुपारनंतर पावसाने थैमान घातल्याने शेतकऱ्याच्या हातात तोंडाशी आलेला घास हिरावून घेतल्याची स्थिती आहे. यामध्ये मका, सोयाबीन या काढणी योग्य पिकांचे पावसात भिजून नुकसान झाले.

तर कांदा पिकाला मोठा फटका बसला आहे. द्राक्ष बागेत रोगांचा प्रादुर्भाव वाढता असून घड जिरण्याचे प्रमाण वाढत आहे. तर पिके, भाजीपाला पिके पाण्याखाली गेल्याने शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे. यामध्ये मालेगाव, सिन्नर, सटाणा व देवळा तालुक्यांत नुकसान आहे.

मालेगाव तालुक्यात सर्वाधिक ९० मिमी पावसाची नोंद झाली असून तालुक्यात सर्वदूर अतिवृष्टी झाली. जवळपास १५ महसूल मंडलांत अतिवृष्टीची नोंद झाली. वडनेर महसूल मंडलात जिल्ह्यात सर्वाधिक १५३.५ मिलिमीटर पावसाने हजेरी लावली. अतिमुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीस आलेला मका पाण्यात भिजला तर सोयाबीन पिकाचे नुकसान आहे.

Crop Damage
Flood Damage Crop Kolhapur : कोल्हापुरात पूर नुकसानीचे १२२ कोटी रुपये जमा होण्यास सुरूवात

अनेक शेतकऱ्यांचे खरीप लाल पोळ कांदा पीक बाधित झाले. तर नव्याने रब्बी कांदा लागवडीसाठी तयार केलेल्या रोपवाटिकाही खराब झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसल्याचे चित्र आहे. याशिवाय शेवग्याचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. लागवडी भुईसपाट झाल्याने शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.

१९२१ मध्ये रावळगाव शुगर फॅक्टरी परिसरात शेतकऱ्यांसाठी पाण्याचा पाट काढला होता. या पाटाचे पाणी मालेगावपर्यंत सुरळित दोधेश्वरी नदीवर ब्रिटिश काळात बनवण्यात आलेले (दगडी बांधकाम) प्रसिद्ध सात कमानी या रात्री पावसामुळे अचानक तुटल्या.

बागलाण तालुक्यातील सर्वदूर पावसाचा जोर दिसून आला. यामध्ये ब्राह्मणगाव, वीरगाव, बागलाण परिसरात मुसळधार पाऊस झाला. कळवण तालुक्यात सर्वदूर पाऊस पडला. येथील कांदा रोपवाटिका व भाजीपाला पिकांचे नुकसान आहे.

तर अगाप द्राक्ष पीक काढणीसाठी येत असून आलेल्या पावसामुळे शेतकरी तणावात आहेत. पूर्व भागातील येवला, नांदगाव, निफाड, सिन्नर तालुक्यांत मध्यम ते जोरदार पाऊस झाला. अचानक आलेल्या पावसामुळे काढणी केलेली सोयाबीन व मका पिके पावसात भिजली. चारापिके व काही प्रमाणात भाजीपाला पिकांना फटका बसला.

यासह छाटणी झालेल्या द्राक्ष बागांचे नुकसान वाढले. धरणांच्या पाणलोट क्षेत्रात पेठ, इगतपुरी, सुरगाणा व त्रंबकेश्वर तालुक्यात पावसाचा जोर कमी दिसून आला. मात्र झालेल्या पावसामुळे भात पिकांचे नुकसान झाल्याचे शेतकऱ्यांनी कळवले आहे.

Crop Damage
Crop Damage Compensation : नुकसानग्रस्तांच्या भरपाईला नवीन वर्ष उजाडणार?

या महसूल मंडलांत अतिवृष्टी कंसात पाऊस मिमीमध्ये

मालेगाव (८१.८), दाभाडी (८८.३), वडनेर (१५३.५), करंजगव्हाण (८६.३), कौळाने (१०८.३), सौंदाणे (११८.३), सायने (७८.३), अजंग (१०६.५), जळगाव निंबायती (१०९), निमगाव (७७.८), बागलाण (९५.८), ब्राह्मणगाव (१२१.३), नामपूर (७३.३), वीरगाव (७७.३), उमराणे (१३५.५).

जोरदार पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान आहे. घड नुकसानीचे प्रमाण वाढले आहे. तसेच टोमॅटो, सोयाबीन, मका अशा भाजीपाला व खरीप पिकांचेही नुकसान होत आहे.
- किशोर निफाडे, शेतकरी, शिरवाडे वणी, ता. निफाड
मुसळधार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे सोयाबीनचे नुकसान झाले. काही ठिकाणी सोयाबीनच्या शेतात पाणी साचल्याने सोयाबीन भिजून गेली. टोमॅटो, काकडी, मिरची पिकांचे मोठे नुकसान झाले. हाताशी आलेले पीक पावसाने गेले.
- सुनील भिसे, शेतकरी, मोह, ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com