Crocodile Sighting : कृष्णा’नंतर आता कोयनेलाही ‘मगर’मिठी

Koyna River News : कृष्णा नदीत मगर असल्याची वन विभाग खात्री देत आहे. पाच वर्षांपासून येथील कृष्णा नदीत दिसणारी मगर कालपासून कोयना नदीपात्रात शहरातील शुक्रवार पेठेलगतच्या बाजूला दिसू लागली आहे.
Crocodile Sighting
Crocodile Sighting Agrowon
Published on
Updated on

Karad News : कृष्णा नदीत मगर असल्याची वन विभाग खात्री देत आहे. पाच वर्षांपासून येथील कृष्णा नदीत दिसणारी मगर कालपासून कोयना नदीपात्रात शहरातील शुक्रवार पेठेलगतच्या बाजूला दिसू लागली आहे.

त्यामुळे कृष्णेसोबतच आता कोयना नदीकाठावरील स्थानिकांत घबराटीचे वातावरण आहे. कोयनेच्या पात्रात पहिल्यांदाच मगरीचे दर्शन झाल्याने नागरिकांत औत्सुक्यासह भीतीचे वातावरण आहे. नागरिकांनी सावध राहावे, घाबरून जाऊ नये, असे आवाहन वन विभागाने केले आहे.

Crocodile Sighting
Crocodile Conservation : महाडमध्ये मगर संवर्धन प्रकल्प

पाच वर्षांपासून वावर

कृष्णेच्या पात्रात सुमारे पाच वर्षांपासून मगर दिसते आहे. शहरी भागातही तीन वर्षांपूर्वी, तर कृष्णेच्या ग्रामीण भागात त्या आधीपासून मगरीचा वावर आहे. दुपारीच्या सुमारास कृष्णाकाठी मगर दिसते. शहरातील वाखाण भागात रानातील मळीमध्ये मगरीचे दर्शन झाल्याच्या घटना ताज्या आहेत. ती मगर तब्बल बारा फुटांची होती.

तीच मगर कोयना नदीच्या शहरातील शुक्रवार पेठेतील परिसरात फिरणाऱ्या नागरिकांना दिसली. तत्पूर्वी कृष्णेच्या मालखेड, आटके परिसरातही मगर दिसली होती. ती मगर आता शहरी भागातही दिसते आहे. आता तिचा कोयनच्या पात्रात वावर वाढल्याने घबराट आहे. रानातील मळीत मगर निवांत झोपल्याची छायाचित्रे समाज माध्यमावरही व्हायरल होत आहेत.

Crocodile Sighting
Koyna Hydropower Project: कोयना विद्युतगृहासाठी ८६२ कोटींना मान्यता

वन विभागाचे आवाहन

मालखेड, आटकेनंतर शहरातीलही काही भागांत विशेष करून कोयना नदीपात्रात मगर दिसल्याने कोयना व कृष्णाकाठावरील गावांत व शहरी भागात घबराटीचे वातावरण आहे. नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन वन विभागाने केले आहे. मगरीच्या दर्शनाच्या घटना घडू लागल्याने चर्चा आहे. त्यामुळे घबराटीसह खळबळ उडाली आहे.

त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये. नगर दिसल्यास वन विभागाला १९२६ या टोल फ्री नंबर कळवावे अथवा प्रत्यक्षात माहिती द्यावी. मगरीच्या भक्ष्याच्या यादीत अजून मनुष्य नाही. त्यामुळे मगर माणसांवर हल्ला करते, हा समज मनातून काढून टाकावा, तसेच अफवांवर विश्वास ठेवू नये.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com