Cotton Seeds Sale : कपाशी बियाण्याची जादा दराने विक्री केल्यास कारवाई : सामाले

Kharif Season : परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात लागवडीसाठी कपाशीच्या १० लाखावर बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे.
Agriculture Development Officer Deepak Samale
Agriculture Development Officer Deepak SamaleAgrowon
Published on
Updated on

Parbhani News : परभणी जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात लागवडीसाठी कपाशीच्या १० लाखावर बियाणे पाकिटांची मागणी करण्यात आली आहे. आजवर ३ लाख १० हजारावर बियाणे पाकिटांचा पुरवठा करण्यात आला आहे. बियाणे विक्री सुरू झाली आहे. शेतकऱ्यांनी विशिष्ट वाणांचा आग्रह धरू नये.

बियाणे विक्रेत्यांनी किमान किरकोळ किंमतीपेक्षा (एमआरपी) अधिक दराने बियाणे पाकिटांची विक्री करू नये. जादा दराने विक्री करणाऱ्या विक्रेत्यांवर कडक कारवाई केली जाईल, असे निर्देश जिल्हा कृषी विकास अधिकारी दीपक सामाले यांनी दिले.

Agriculture Development Officer Deepak Samale
Cotton Seed Supply : अकोल्यात विशिष्ट कंपनीच्या बियाण्याचा पुरवठा रोखला

खरीप हंगामातील बियाणे मागणी,पुरवठा व विक्री या अनुषंगाने परभणी कृषी उत्पन्न बाजार समिती सभागृहामध्ये मंगळवारी (ता. २१) बियाणे विक्रेत्यांची बैठक घेण्यात आली. यावेळी लातूर विभागीय कृषी सहसंचालक कार्यालयातील तंत्र अधिकारी प्रवीण भोर, जिल्हा परिषदेचे कृषी अधिकारी शंकर बलशेटवाड, पंचायत समितीचे कृषी अधिकारी कदम आदींसह कर्मचारी, विक्रेते उपस्थित होते.

सामाले म्हणाले, की यंदा जिल्ह्यात कपाशीच्या लागवड क्षेत्रात १ लाख ९७ हजार हेक्टरपर्यंत लागवड प्रस्तावित आहे. त्यासाठी शेतकऱ्यांना बियाणे पुरवठा करण्यासाठी कपाशीच्या बियाण्याच्या १० लाखांवर बियाणे पाकिटांची मागणी बिजोत्पादन कंपन्यांकडे करण्यात आली आहे. आजवर ३ लाख १० हजारांवर पाकिटांचा पुरवठा झाला आहे.

Agriculture Development Officer Deepak Samale
Cotton Seed Case : बियाणे विक्रेत्यांविरुद्ध १८ न्यायालयीन खटले

बुधवार (ता. १६) पासून बियाणे विक्री सुरू झाली आहे. परंतु गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी १ जूननंतरच लागवड करावी. चांगल्या पावसानंतर जमिनीत पुरेशा प्रमाणात ओलावा निर्माण झाल्यावर लागवड करावी. कपाशीच्या विविध कंपन्यांच्या वाणांच्या बी. टी. बियाण्याचा ४७५ ग्रॅम वजनाच्या पाकिटाची एमआरपी ८६४ रुपये आहे.

परंतु त्यापेक्षा जादा दर आकारले जात असल्याच्या तक्रारी शेतकरी करत आहेत. जादा दराने विक्री करत असलेल्या बियाणे विक्रेत्यांवर परवाने निलंबन तसेच रद्द करण्याची कारवाई केली जाईल. शेतकऱ्यांनी देखील विशिष्ट वाणांचा आग्रह धरत जादा दराने खरेदी करु नये. जादा दराने बियाणे तसेच अन्य निविष्ठांची विक्री होत असल्यास तालुका तसेच जिल्हा स्तरावरील तक्रार निवारण कक्ष तसेच भरारी पथकांशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com