
किरण वाघमारे, डॉ.अजय सोनवणे
Fish Breeding : जनुकीयदृष्ट्या सुधारित मासे म्हणजे त्यांच्या जनुकामध्ये हस्तक्षेप करून बदल करण्यात आले आहेत. या बदलामुळे माशांच्या वाढीचा वेग वाढतो. त्यांना लवकर बाजारपेठेत विक्रीसाठी आणता येते. यातून उत्पादक तसेच कंपन्यांना अधिक नफा मिळतो. ट्रान्सजेनिक तंत्रज्ञानाचा वापर यासाठी केला जातो.
जनुकीय तंत्रज्ञानाचा वापर करून विविध प्रजातींमध्ये सुधारणेसाठी जलद आणि कार्यक्षम पद्धतीचा अवलंब केला जातो. माशांमध्ये उत्कृष्ट जाती विकसित करण्यासाठी जनुक हस्तांतरण अभ्यास होत आहे. जलचर प्रजातींमध्ये वापरण्यात येणारे सर्वात लोकप्रिय घटक हा ग्रोथहार्मोन आहे. याचा उद्देश प्रजातींच्या वाढीचा दर वेगाने करण्यासाठी होतो.
ग्लो फिश
ट्रान्सजेनिक शोभेच्या माशांना ‘ग्लो फिश'म्हणून ओळखले जाते. जेलीफिशपासून वेगळे केलेल्या फ्लोरोसंट जनुकांचा वापर केला जातो. यातून रंगीत फ्लोरोसेंट माशांच्या जाती विकसित होत आहेत. ट्रान्सजेनिक मासे फार्मास्युटिक्स तयार करण्यासाठी वापरण्याचे नियोजन आहे.
भारतात या तंत्रज्ञानाच्या वापरास सुरवात होत आहे. नैसर्गिक मत्स्यपालनाचे संवर्धन आणि व्यवस्थापन करण्यासाठी हे तंत्रज्ञान महत्त्वपूर्ण असेल.ट्रान्सजेनिक मासे चांगले सकल अन्न रूपांतरण दर्शवितात, प्रति एकक अन्नाच्या वजनात वाढ होते.
जनुकीय हस्तांतरण प्रयोगांसाठी विविध माशांच्या प्रजातीवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. यासाठी दोन गट करण्यात आले आहेत.
मत्स्यपालन/संवर्धनासाठी वापरले जाणारे मासे : प्रमुख कार्प माशांच्या प्रजातींमध्ये कार्प (सायप्रिनस प्रजाती), तिलापिया (ओरिओक्रोमिस प्रजाती), साल्मन (साल्मो प्रजाती., ओंकोरहिन्कस प्रजाती) आणि चॅनेल कॅटफिश (इकटालुरस पंक्टॅटस)
मूलभूत संशोधनासाठी वापरले जाणारे मासे: झेब्रा फिश (डॅनियो रेरियो), मेडाका (ओरिझियास लॅटिपेस), गोल्ड फिश (कॅरॅसियस ऑरॅटस)
अनुवांशिकदृष्ट्या सुधारित मत्स्यबीजांची भूमिका
अनुवांशिकदृष्ट्या सुधारित मत्स्यबीज म्हणजे शास्त्रज्ञांनी प्रयोगशाळेत माशांच्या जनुकांमध्ये बदल करून तयार केलेले मत्स्यबीज. या बदलामुळे माशांना काही विशिष्ट गुणधर्म प्राप्त होतात.
उत्पादन वाढ: मासळी अधिक जलद वाढते.त्यामुळे उत्पादनवाढीसाठी फायदा होतो.
रोग प्रतिकारक शक्ती: सामान्य मासळीपेक्षा रोग प्रतिकार करण्याची क्षमता अधिक असते.
पर्यावरणीय अनुकूलता: काही प्रजाती प्रदूषित पाण्यात जगू शकतात.
फायदे
मत्स्यपालन क्षेत्राला चालना: या तंत्रज्ञानामुळे मत्स्यपालन क्षेत्राला मोठी चालना मिळू शकते.
अन्न सुरक्षा: वाढत्या लोकसंख्येला पुरेसा अन्न पुरवठा करण्यासाठी हे एक महत्त्वाचे साधन ठरणार आहे.
ट्रान्सजेनिक मासे, शोभेच्या माशांची जागतिक परिस्थिती गेल्या चार दशकांमध्ये जलसंवर्धन, औद्योगिक आणि औषधनिर्मितीमधील संशोधनासाठी आवश्यक संप्रेरक तयार करणाऱ्या ट्रान्सजेनिक रेषा असलेल्या विविध ट्रान्सजेनिक माशांच्या जाती विकसित करण्यात आल्या आहेत. बहुतेक ट्रान्सजेनिक मासे हे ग्रोथ हार्मोन वापरून विकसित करण्यात येतात. कारण त्याचे महत्त्व आणि अत्यंत संरक्षित जनुक अनुक्रम. अनुवांशिकरित्या सुधारित माशांच्या वाढीच्या दरात उत्कृष्ट सुधारणा दिसून येते.
वाढीच्या वैशिष्ट्यांव्यतिरिक्त रोग प्रतिकारशक्ती तसेच इतर वैशिष्ठ्ये म्हणजे थंडी किंवा हायपोक्सिया सहनता आणि खाद्य रूपांतरण गुणोत्तर सुधारणा या तंत्रज्ञानामध्ये विचारात घेतल्या जातात.
‘ॲक्वा ॲडव्हांटेज सॅल्मन' ही ‘एफडीए‘ने मान्यता दिलेली पहिली ट्रान्सजेनिक फूड प्रजाती आहे. याचा वाढीचा दर आणि आकार नैसर्गिक तुलनेत वाढलेला आहे.
- किरण वाघमारे, ९८८१६००९५१
( किरण वाघमारे हे पुणे येथे साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आहेत.डॉ.अजय सोनवणे हे बीड येथे साहाय्यक मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी आहेत)
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.