Agriculture Department : कृषी विभागातील पदभरतीच्या नियुक्तीबाबत न्यायालयाची स्थगिती

Agriculture Job : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी या पदांची भरती प्रक्रिया करण्याची प्रक्रिया केली.
Agriculture Department
Agriculture DepartmentAgrowon

Nagar News : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत कृषी विभागातील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी या पदांची भरती प्रक्रिया करण्याची प्रक्रिया केली. मात्र यात अभियांत्रिकी विषय रद्द करून त्या शाखेच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला.

याविरोधात आंदोलन केले. मात्र दखल घेतली नसल्याने न्यायालयात याचिका दाखल केली. त्यानंतर आता न्यायालयाने पदभरतीला ३ मार्चपर्यंत स्थगिती दिली आहे, अशी माहिती याचिकाकर्ते चेतन पवार यांनी दिली.

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषिसेवा परीक्षा २०२१-२०२२ अंतर्गत गट ‘अ’ व गट ‘ब’ मधील कृषी उपसंचालक, तालुका कृषी अधिकारी व मंडळ कृषी अधिकारी या ४१७ पदांची भारती प्रक्रिया करण्यासाठी दोन वेळा जाहिरात देऊन परीक्षा घेण्यासह अन्य प्रक्रिया केली. मात्र या परीक्षेसाठी असलेल्या पेपरमधील अभियांत्रिकीचा विषय रद्द करून अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांवर अन्याय केला.

Agriculture Department
Agriculture Department : नांदेड कृषी विभागाकडून ९० कोटींचा आराखडा सादर

१८ फेब्रुवारी २०२२ च्या जाहिरातीसाठी परीक्षार्थींना कोणतीही पूर्वसूचना न देता केवळ सात दिवस आधी ११ फेब्रुवारी २०२२ रोजी ‘एमपीएससी’ आयोगाने अचानकपणे मुख्य परीक्षा अभ्यासक्रमात सदोष बदल केले. १६ जून २०२१ रोजीच्या घोषणेशी विरोधाभास असलेला कृषी सेवा मुख्य परीक्षेचा सदोष अभ्यासक्रम प्रसिद्ध केला.

Agriculture Department
Agriculture Department : ‘कृषी’तील २०३ उमेदवारांच्या नियुक्‍तीचा प्रश्‍न ऐरणीवर

नवीन अभ्यासक्रमात कृषिसेवा मुख्य परीक्षेसाठी ४०० गुणांपैकी २८० गुणांसाठी असलेला कृषी अभियांत्रिकी विद्याशाखेच्या अभ्यासक्रमाचे गुणभारांकन आयोगाने २८० वरून केवळ १६ गुण एवढे कमी केले. अभ्यासक्रमात बी.एस्सी.अॅग्री पदवी अभ्यासक्रमाला ४०० पैकी २४८ गुणांचे भारांकन असून बी. टेक. कृषी अभियांत्रिकी व इतर कृषिसंलग्न पदवी अभ्यासक्रमास ४०० पैकी केवळ १६ गुण किंवा त्याहून कमी गुणभारांकन आहे.

त्यामुळे बी.एस्सी. अॅग्री पदवीधारकांशिवाय इतर विद्याशाखांना समान संधी दिली नाही. ११ फेब्रुवारी २०२२ च्या सदोष अभ्यासक्रमाद्वारे आयोगाने अंतिम निवड झालेल्या परीक्षार्थींमध्ये ९२ टक्क्यांहून अधिक परीक्षार्थी हे केवळ एकाच बीएस्सी कृषी पदवीचे आहेत. या विरोधात चेतन पवार व वर्षा मांदळे यांनी न्यायालयात याचिका दाखल केली होती.

शेतीच्या विकासासाठी अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची गरज असल्याचे राज्यपालांनी मान्य करत राज्याच्या प्रधान सचिवांना पत्र दिले आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने कृषी सेवा परिक्षेत पदभरती करण्यासाठीच्या अभ्यासक्रमात अभियांत्रिकी विद्यार्थ्यांवर अन्याय केला आहे. न्यायालयाचा निकाल येईपर्यंत संबंधित परीक्षेतील कोणतीही नियुक्ती देऊ नये, असे न्यायालयाने सांगितले आहे.
- चेतन पवार, याचिकाकर्ते, राहुरी, जि. नगर

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com