हवामान बदलाच्या काळात ऊस, द्राक्षे आदी पिकांतून अर्थकारण जुळणे कवठेएकंद (जि. सांगली) येथील जीवन आणि अश्विनी या चिप्रीकर दांपत्याला अशक्य वाटले. त्यांनी आठ वर्षांपूर्वी रेशीम शेतीची वाट धरली. पूर्वी जुळत नसलेले अर्थकारण जुळवून आणले. तुती म्हणजे तू व ती म्हणजे जोडीने करावयाचा रेशीम उद्योग असून त्यातून तो यशस्वी होतो. त्यानेच आम्हाला वेगळी ओळख देखील दिल्याची प्रतिक्रिया दांपत्याने दिली आहे. .सांगली जिल्ह्यात द्राक्ष व बेदाण्यासाठी प्रसिद्ध तासगाव तालुक्यात कवठे एकंद गाव आहे. या भागात द्राक्षासह ऊस हे देखील प्रमुख पीक आहे. येथील ग्रामदैवताचे पुरातन सिद्धराज देवालयही प्रसिद्ध आहे. सिद्धराज देवस्थानात कपिल महामुनींचे वास्तव्य होते. दसऱ्यादिवशी श्री. बिऱ्हाडसिद्ध महाराजांचा पालखी सोहळा व फटाक्यांची आतषबाजी हा पाहण्यासारखा सोहळा असतो..Silk Farming: रेशीम बीजकोष निर्मितीत मिळवले प्रावीण्य.सुमारे ३५० हून अधिक वर्षांच्या जपलेल्या या परंपरेमुळे कवठे एकंदने देशभर लौकिक मिळवला आहे. याच गावातील प्राथमिक शिक्षक म्हणून निवृत्त झालेले अशोक चिप्रीकर यांची सव्वाचार शेती आहे. आज मुलगा जीवन घरची व खंडाने घेतलेली सात एकर शेती पत्नी अश्विनी यांच्या मदतीने समर्थपणे सांभाळतो आहे. .पारंपरिक चौकटीतून बाहेर जीवन यांनी २००८ पासून घरची शेती खांद्यावर घेतली. उसाबरोबर भाजीपाला, झेंडू अशी पिकेही घेतली. ऊस हे दीर्घ कालावधीचे पीक असल्याने त्यातून वर्ष- दीड वर्षांनीच पैसा हाती यायचा. हवामान बदलाच्या कालात द्राक्षासारख्या पिकातही जोखीम तयार झाली होती. अशावेळी पूरक व्यवसायांच्या वाटा शोधल्या. पारंपरिक चौकटीतून बाहेर पडून नवीन काही करण्याची इच्छा होती. इमूपालनाची माहिती घेतली. पण जोखीम अधिक .Silk Farming: म्हसोबाची वाडी गाव वळाले रेशीम शेतीकडे.असल्याचं लक्षात आल्यावर तो निर्णय थांबवला. अशावेळी रेशीमपालन करण्याचा विचार मनात आला. सन २०१६- १७ च्या दरम्यान हाच उद्योग करण्याचा निर्धार केला. बारामती भागातील साबळेवाडी येथे रेशीम शेती प्रत्यक्ष पाहण्याचा अनुभव मिळाला. माती, पाऊस, उन्हाळा, थंडी यांचा फारसा परिणाम उद्योगावर होत नव्हता..शेडमध्ये नियंत्रित वातावरण होतं. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक बॅचनंतर म्हणजे दीड- दोन महिन्यांत ताजे पैसे हाती येत होते. अधिक अभ्यासासाठी कर्नाटक राज्यातील चिकोडी, ऐनापूर या परिसरात जाऊन तेथील रेशीमपालन पाहिले. रेशीम विभागाचे अधिकारी सुनील पाटील यांच्याकडून सर्व बारकावे माहीत करून घेतले. अखेर या उद्योगात पाऊल टाकले. .यशस्वी कोष निर्मिती सन २०१७ मध्ये ६० बाय २६ फूट आकाराचे शेड उभारले. त्यात दोन रॅक व प्रत्येकी रॅकवर पाच थर अशी मांडणी केली. बायव्होल्टाईन असा कीटकाचा प्रकार आहे. सुरवातीच्या काही बॅचेसमध्ये अडचणी जरूर आल्या. मात्र जसजसा अनुभव व कौशल्य वृद्धिंगत होत गेलं तसतशा बॅचेस यशस्वी होऊ लागल्या. आज आठ वर्षांचा तगडा अनुभव तयार झाला आहे. वर्षातून सात बॅचेस घेतल्या जातात. प्रति बॅच २०० अंडीपुंजांची असते..Silk Farming: रेशीम उद्योगात उझी माशीसह रोग नियंत्रणात यश.प्रति १०० अंडपुंजांमागे ८० ते ९० तर प्रति बॅचमागे १९० किलो रेशीमकोष उत्पादन मिळते. गडहिंग्लज येथील रेशीम कार्यालयाकडून अंडीपुंजांचा पुरवठा होतो. सातारा जिल्ह्यातील अनिकेत गुजर यांच्याकडून प्रति शंभर अंजीपुंजांमागे ३२०० रुपये या दराने चॉकी कीटकांची खरेदी केली जाते. त्यांचा घरपोच पुरवठा होतो. .कोषांचा दर्जा जपला प्रति कोषापासून ९०० ते १२०० मीटर धागा तयार होत असेल तर त्याचा चांगला दर्जा असतो असे कळले. त्या दृष्टीने गुणवत्ता मिळवण्याचे प्रयत्न सुरू झाले. तुतीच्या पाल्याचा दर्जाही तसे शेती व्यवस्थापन करून जपला. .Silk Farming: रेशीम उद्योगाने दिले आर्थिक स्थैर्य.गावातच मिळाली बाजारपेठ जीवन व अश्विनी असे दोघेच जण रेशीम उद्योगात राबतात. केवळ कोषनिर्मितीच्या अखेरच्या टप्प्यात मजुरांची मदत घेतली जाते. असा रीतीने मजुरांवरील खर्च वाचवला आहे. रामनगर (कर्नाटक) हीच हुकमी बाजारपेठ असल्याने तिथे विक्री सुरु केली. मात्र चार वर्षापूर्वी गावातच कोषांपासून धागा निर्मितीचा खासगी प्रकल्प सुरू झाला. त्यामुळे गावातच हक्काची बाजारपेठ उपलब्ध झाली. त्यामुळे बाहेरील बाजारात जाण्यासाठी लागणारा वेळ, वाहतूक खर्च तसेच त्यातील श्रमांचा भारही कमी झाला. आता गावातच प्रति किलो साडेपाचशे रुपयांपर्यंत दर मिळतो. अलीकडील वर्षांत ६५० रुपयांपर्यंत दर मिळाला आहे. वर्षभरातील सर्व बॅचेसचा विचार करता व खर्च वजा जाता ६० टक्क्यांपर्यंत नफा होत आहे. .तुतीचा अर्थ तू व ती जीवन सांगतात की रेशीम शेती म्हणजे तुती. परंतु तुती या नावातच तू व ती असे आहे. म्हणजे नवरा- बायको यांनी मिळून करावयाचा हा उद्योग आहे. तरच त्यात चांगला फायदा आहे. आम्ही दोघांनी जोडीने हा उद्योग एकदिलाने, प्रेमपूर्वक जपला. वाढवला. आज घरातील सर्व दैनंदिन खर्च त्यातून भागवता येतात. फोर व्हिलरही घेतली आहे. मुली सानवी व इरा दोघींना उत्तम शालेय शिक्षण देता येत आहे. मुलींची नावे ठेवण्यामध्येही जीवन यांनी प्रतिभा वापरली आहे. एकीचे नाव लक्ष्मी व दुसरीचे नाव सरस्वती देवीचे ठेवले आहे..आज ऊसपट्ट्यात रेशीम शेती केली व ती यशस्वी झाली. त्यातून पंचक्रोशीत वेगळी ओळख आम्हाला मिळाली याचा आनंद आहे. कोणतेही शुल्क न घेता मी सर्व गरजू शेतकऱ्यांना रेशीम शेतीत मार्गदर्शन करतो. त्यांच्या समस्या सोडवतो याचे समाधान आहे. कोणतीही गोष्ट तुम्ही जितकी निरपेक्ष भावनेने द्याल तेवढी दुप्पट प्रमाणात तुम्हाला त्याचा परतावा निसर्ग देत असतो. आपण आपले काम असेच कोणताही अपेक्षा न ठेवता करीत राहायचे असते.जीवन चिप्रीकर९५६१४२९८५७.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.