Cotton Procurement : मध्य प्रदेशासह चार राज्यांत ‘सीसीआय’ची कापूस खरेदी सुरू; महाराष्ट्रात खरेदीची तयारी पूर्ण

Cotton Procurement in Maharashtra : हरियाना, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी सुरू केली आहे.
Cotton Rate
Cotton Rate Agrowon
Published on
Updated on

Jalgaon News : देशात कापूस दरांवर दबाव वाढला आहे. ही स्थिती लक्षात घेता शासनाने खरेदीसंबंधी हस्तक्षेप करून शेतकऱ्यांना आधार दिला असून, हरियाना, राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेशात भारतीय कापूस महामंडळाने (सीसीआय) खरेदी सुरू केली आहे. ७०२० रुपये प्रतिक्विंटल दर किंवा हमीभाव कापसाला तेथे दिला जात आहे.

Cotton Rate
Procurement of Cotton : ...अन्यथा कापूस खरेदी थांबविणार ; कॉटन जिनिंग ट्रेडर्स संघटनेचा इशारा

तेलंगणात पुढील आठवड्यात खरेदी सुरू होणार आहे. सध्या देशात सुमारे ५३ खरेदी केंद्र सीसीआयचे सुरू आहेत. तेलंगणात १२० खरेदी केंद्रे सुरू होणार आहेत. महाराष्ट्रातही किती केंद्रे सुरू करायची, याचे नियोजन झाले आहे. परंतु महाराष्ट्रातील खरेदी दिवाळीनंतर सुरू होईल, असेही संकेत सीसीआयच्या सूत्रांनी दिले आहेत.

कापसाचे दर राज्यात हमीभावापेक्षा अधिक अल्प शेतकऱ्यांना किंवा कापूस उत्पादकांना सध्या मिळत आहेत. कमाल दर खानदेश, पश्‍चिम विदर्भात हमीभावापेक्षा कमीच आहेत. उत्तर भारतातही दरांवर दबाव वाढला आहे. देशातील कापूस प्रक्रिया उद्योग रखडत सुरू आहे. जिनिंग प्रेसिंग कारखानदार कापूस दरांमधील चढ-उताराने वित्तीय संकटांचा सामना करीत आहेत. यामुळे कापूस उत्पादक शेतकऱ्यांना आधार देण्याची आवश्यकता लक्षात घेता सरकारने बाजारात हस्तक्षेप केला असून, खरेदी सुरू केली आहे.

Cotton Rate
Shahada APMC : शहादा बाजार समितीमध्ये कापूस लिलावाला दणक्यात सुरुवात

उत्तर भारतात (मध्य प्रदेशसह) सुमारे १० लाख कापूस गाठींच्या (एक गाठ १७० किलो रुई) खरेदीचे नियोजन तूर्त सरकारने केले आहे. तसेच तेलंगणात सुमारे पाच लाख गाठींची खरेदी केली जाईल. या तुलनेत महाराष्ट्रातील खरेदी अधिकची असणार आहे, अशी माहिती मिळाली.

राज्यात यंदा सुमारे ४२ लाख हेक्‍टरवर कापसाची लागवड करण्यात आली आहे. त्या माध्यमातून सुमारे ४०० लाख क्‍विंटल कापसाच्या उत्पादकतेचा अंदाज आहे. महाराष्ट्रात अकोला व छत्रपती संभाजीनगर या विभागांतर्गत कापूस खरेदीसंबंधी सुमारे १६२ खरेदी केंद्र सीसीआय सुरू करण्याच्या तयारीत आहे. यात सर्वाधिक खरेदी केंद्र विदर्भात असतील. खरेदी केंद्र निश्‍चित आहेत. त्यात खरेदीसंबंधीची तयारीदेखील झाली आहे. कर्मचाऱ्यांची नियुक्तीदेखील सीसीआयने केली आहे, असे सांगण्यात आले.

देशात हरियाना, राजस्थान व मध्य प्रदेशात सीसीआयची कापूस खरेदी सुरू झाली आहे. तेलंगणातील खरेदी पुढील दोन-तीन दिवसांत सुरू होईल. सध्या कापसाला लांब धाग्यासंबंधी निश्‍चित केलेला ७०२० रुपये प्रतिक्विंटलचा दर दिला जात आहे.
अर्जुन दवे, मुख्य (खरेदी), दक्षिण भारत विभाग, सीसीआय
कापूस खरेदी केंद्र सुरू केली आहेत. आतापर्यंत सहा हजार क्‍विंटल कापूस खरेदी झाली आहे. महाराष्ट्रात ९० केंद्रे प्रस्तावित आहेत. महाराष्ट्रातील खरेदीसाठी आमची यंत्रणा सज्ज असून, शेतकऱ्यांचा कापूस आला तर तो खरदी केला जाईल.
- ललीतकुमार गुप्ता, मुख्य व्यवस्थापकीय संचालक, भारतीय कापूस महामंडळ (सीसीआय)
कापूस बाजारावर दबाव आणि नियंत्रणासाठी सीसीआय, पणन महासंघाचा दबाव गरजेचा आहे. सध्या बाजारात हमीभावापेक्षा अधिकचा दर असला तरी आवक वाढली आणि शासकीय हस्तक्षेप नसेल तर व्यापारी दर पाडतील. त्यामुळे सीसीआयने अथवा राज्य सरकारने परवानगी देऊन पणन महासंघामार्फत खरेदी होणे गरजेचे आहे. पूर्वहंगामी कापूस लागवड असलेल्या दक्षिण भारतातील राज्यांसह जळगाव खानदेश परिसरात कापूस बाजारात आला आहे.
- गोविंद वैराळे, कापूस विपणन क्षेत्रातील तज्ज्ञ

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com