Cotton Cultivation: कापूस लागवड घटली अडीच लाख हेक्टरने

Maharashtra Agriculture: मे महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे कापसाची लागवड दरवर्षीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज होता. मात्र जून व जुलैमधील वीस ते पंचवीस दिवसांचा मोठा खंड आणि गतवर्षी कमी दर मिळाल्यामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे.
Cotton Cultivation
Cotton CultivationAgrowon
Published on
Updated on

Ahilyanagar News: मे महिन्यात झालेल्या चांगल्या पावसामुळे कापसाची लागवड दरवर्षीपेक्षा अधिक होण्याचा अंदाज होता. मात्र जून व जुलैमधील वीस ते पंचवीस दिवसांचा मोठा खंड आणि गतवर्षी कमी दर मिळाल्यामुळे लागवडीवर परिणाम झाला आहे. राज्यात आतापर्यंत गेल्या वर्षीपेक्षा २ लाख ५३ हजार हेक्टर तर सरासरीपेक्षा ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड कमी झाली आहे.

राज्यात खरिपाचे १४४ लाख ३६ हजार ५४ हेक्टर सरासरी क्षेत्र असून आतापर्यंत १३७ लाख ५९ हजार ७६१ हेक्टरवर पेरणी झाली आहे. कापसाचे पीक राज्यात महत्त्वाचे असून ४२ लाख ४७ हजार २१२ हेक्टर सरासरी क्षेत्र आहे. यंदा आतापर्यंत ३८ लाख १७ हजार २२१ हेक्टर क्षेत्रावर कापसाची लागवड झाली आहे. गेल्यावर्षी आतापर्यंत ४० लाख ७० हजार २९६ हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होता.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : कापूस लागवड रखडत; कोरडवाहू क्षेत्रात घट

गेल्या वर्षी कापसाचे उत्पादन कमी झाले, दरही मोठ्या प्रमाणात पडले. दोन वर्षांपूर्वी ९ ते १० हजारांचे विकलेला कापूस गतवर्षी साडेसहा ते सात हजार रुपये हेक्टरने विकावा लागला होता. याशिवाय यंदा मध्यंतरी ऐन लागवडीच्या काळात मोठा पावसाचा खंड पडला. त्या साऱ्या बाबीचा लागवडीवर परिणाम झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीच्या लागवड क्षेत्राचा विचार केला तर गेल्या वर्षीपेक्षा यंदा २ लाख ५३ हजार हेक्टर तर सरासरीपेक्षा ४ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्रावर कापूस लागवड कमी झाली आहे.

Cotton Cultivation
Cotton Cultivation : पूर्वहंगामी कापूस लागवड पूर्णत्वाकडे

राज्यात साधारण २१ जिल्ह्यांत कापसाचे लागवड क्षेत्र अधिक असते. यंदा लातुर, वाशीम, यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांत मात्र सरासरीपेक्षा अधिक झालेली लागवड वगळता सर्वच जिल्ह्यांत कापूस लागवड सरासरीच्या आणि गतवर्षीपेक्षा कमी आहे. कोकणातील सर्व जिल्ह्यांसह कोल्हापूर जिल्ह्यात अजिबात कापसाची लागवड नाही. सांगली, सातारा, धाराशीव, भंडारा, गोंदिया जिल्ह्यांत कापसाची लागवड अत्यल्प आहे.

जिल्हानिहाय कापूस लागवड (कंसात गतवर्षीची लागवड)

नाशिक ः २९,९७४ (३९,१७४), धुळे ः १,८०,५२६ (२,१९,७०५), नंदुरबार ः १,०७,०१९ (१,२५,१५२), जळगाव ः ४,३४,२९२ (५,४६,९३३), अहिल्यानगर ः १,३९,३५४ (१,५५,३२९), छत्रपती संभाजीनगर ः २,९२,४३६ (३,८८,५३३), जालना ः २,८६,२७२ (३,२२,३२६), बीड ः २,४१,१८४ (३,२३,८८९), लातुर ः १४,१३० (९,३७७), नांदेड ः १,९३,७७५ (२,०१,४६१), परभणी ः १,९१,४३१ (१,९१,९५५), हिंगोली ः ३६,९११ (४०,३५८), बुलडाणा ः १,२९,९१६ (१,९७,६३), अकोला ः १,२९,९४८ (१,२८,५९३), वाशीम ः ३२,००२ (२६,४३८), अमरावती ः २,४०,२९६ (२,६८,४७), यवतमाळ ः ४,९०,५५१ (४,७१,४७०), वर्धा ः २,१६,१७० (२,१८,६११), नागपूर ः २,२०,५७८ (१,८०,९४१), चंद्रपूर ः १,९०,६८६ (१,७८,०५४), गडचिरोली ः १६,१७० (८,४५१).

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com