Peru Farming : पेरूचा एकरी खर्च ४० हजार अन् उत्पन्न केवळ २० हजार

Guava Orchard : दुगलगावच्या लासुरेंकडून दोन एकर पेरूच्या बागेवर कुऱ्हाड
Peru Farming
Peru Farming Agrowon

Nashik News : दहा वर्षे सांभाळलेले दोन एकर पेरूच्या बागेत आर्थिक नुकसान झाल्याने वैतागलेल्या दुगलगाव येथील रामदास लासुरे या शेतकऱ्याने पेरूच्या दोनशे झाडांवर कुऱ्हाड चालवली. दरवर्षीच बागेला ४० ते ५० हजार रुपये खर्च करावा लागत होता. मात्र त्या तुलनेत उत्पन्न २५ ते ३० हजार रुपये हाती पडत असल्याने तोट्यात येणारी ही बाग अखेर दुष्काळात शेतकऱ्याने तोडली.

दुगलगाव म्हणजे मराठवाडा आणि नाशिक जिल्ह्याच्या सीमेवरचे तालुक्यातील उत्तर पूर्व भागातील कायम दुष्काळग्रस्त गाव. या भागातील रामदास लासुरे या शेतकऱ्याने उपलब्ध थोड्याफार पाण्यावर दोन एकरांत २०० लखनऊ ४९ जातीच्या पेरूची बाग लावली होती. रोपे, लागवड, ठिबक, मशागतीसह सुमारे लाखाच्या आसपास खर्च त्यांना नऊ वर्षांपूर्वी आला होता. कृषी विभागाच्या माध्यमातून त्यांना यासाठी अनुदानही मिळाले होते.

पहिल्याच वर्षी इतका मोठा खर्च करूनही शेतकऱ्यांच्या हातात अवघे १५ ते २० हजारांचे उत्पन्न मिळाले होते. मात्र भविष्यात ही बाग चांगले उत्पन्न देईल, या अपेक्षेवर त्यांनी चांगली निगा राखली. मात्र कधी १००, तर कधी ३०० क्रेटवर उत्पादन हाती आलेच नाही. भावदेखील १०० ते १५० रुपयांच्या दरम्यान मिळाल्याने नेहमीच शेतकरी लासुरे यांना तोट्याचा व्यवहार सहन करावा लागला.

एकतर पाण्याची टंचाई असल्याने आणि दोन-तीन वर्षाआड दुष्काळ पडत असल्याने इतर पिके सोडून देत ठिबकवर पेरूची बाग जगविली. अनेकदा तर टँकरने पाणी ओतून ही बाग त्यांनी जागविली. मात्र अपेक्षित उत्पन्न मिळालेच नाही.

Peru Farming
Jowar Crop: ज्वारीतून मिळालं एकरी ५२ हजार रुपये उत्पन्न

व्यापाऱ्याकडूनही फसवणूक
या वर्षी दुष्काळ असल्याने पेरूला चांगली मागणी होती. सरासरी ३०० रुपयांचा दरही मिळाल्याने बाग व्यापाऱ्याला देण्यात आली होती. मात्र व्यापाऱ्याने पेरू तोडून नेले अन् अर्धे पैसे दिले आणि यात नुकसान झाल्याचे सांगत पैसे देण्यात हात वर करून निघून गेला.

परिणामी, पुन्हा एकदा आर्थिक तोटा सहन करण्याची वेळ लासुरे यांच्यावर आली आहे. सततच नुकसान सहन करावे लागत असल्याने लासुरे यांनी या शेतात दुसरे पीक घेता येईल अशा अपेक्षेने बागेवर कुऱ्हाड चालवली.

शेतात वेगळा प्रयोग करावा या हेतूने दोन एकरांतून सुमारे २०० झाडे लावली होती. यातून दोन रुपये चांगले उत्पन्न मिळेल ही अपेक्षा होती. मात्र उत्पन्न आणि दराची कधी सांगडच बसली नाही. परिणामी दरवर्षी तोटा सहन करावा लागला. झाडे जगविण्यासाठी टँकरने वेळप्रसंगी पाणीही दिले. या वर्षी दोन रुपये उत्पन्न मिळण्याची अपेक्षा होती तोच व्यापारी पैसे बुडून गेला.
- रामदास लासुरे, शेतकरी, दुगलगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com