India Climate Leadership: ब्राझीलस्थित अॅमेझॉनच्या जंगलातील (रेनफॉरेस्ट) बेलेम येथे ‘कॉप ३०’ ही जागतिक हवामान परिषद १० ते २१ नोव्हेंबर दरम्यान होत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणे, पर्यावरण रक्षण आणि शाश्वत विकास या अनुषंगाने ही परिषद महत्त्वाकांक्षा, अंमलबजावणी धारणा, विश्वासार्हता सुलभता आणि उत्तरदायित्व या भूमिकेतून निर्णायक ठरण्याची दाट शक्यता आहे.