Cooperative Policy : सहकाराचे धोरण आचारसंहितेपूर्वी जाहीर होणार : वर्मा

Union Minister of State for Co-operation B. L. Varma : "येत्या लोकसभा निवडणुकांच्या आचारसहिंतेपूर्वी नवीन सहकार धोरण जाहीर होणार आहे,’’ अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी दिली.
 B. L. Varma
B. L. Varma Agrowon

Pune News : ‘‘गेल्या कित्येक वर्षांपासून सहकाराचे मोठे जाळे आहे. यात महाराष्ट्रात ही चळवळ सर्वाधिक वाढीस लागली आहे. या चळवळीच्या हितासाठी येत्या लोकसभा निवडणुकांच्या आचारसहिंतेपूर्वी नवीन सहकार धोरण जाहीर होणार आहे,’’ अशी माहिती केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा यांनी दिली.

पुण्यातील वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था (व्हॅम्नीकॉम)येथे नव्याने उभारलेल्या संगम या वसतिगृहाचे उद्घाटन वर्मा यांच्या हस्ते शुक्रवारी (ता. १) झाले. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. पराग काळकर, ‘व्हॅम्नीकॉम’च्या संचालक डॉ. हेमा यादव, डॉ. वाय. एस. पाटील, कुलसचिव आर. के. मेनन आदी उपस्थित होते.

 B. L. Varma
Budget 2024 : शेतीला दुर्लक्षित करण्याचे अलिखित धोरण

वर्मा म्हणाले, ‘‘देशात सहकाराचे सर्वाधिक काम महाराष्ट्रात होत आहे. यात बॅंकिग क्षेत्राचा वाटा अधिक आहे. त्यामुळे अनेक लोक जोडले गेले आहेत. सहकारी साखर कारखानेही मोठ्या प्रमाणात आहेत. सहकार क्षेत्राचे हे महत्त्व ओळखून केंद्र सरकारने स्वतंत्र सहकार मंत्रालय स्थापन केले. गेल्या अडीच वर्षांत या मंत्रालयाने गाव पातळीवरील विविध कार्यकारी सहकारी सोसायट्या मजबूत करण्याचे काम हाती घेतले आहे. आता विविध ३०० प्रकारची कामे या संस्थांद्वारे केली जात आहेत. त्यामुळे ग्रामीण भागातील लोकांचे जीवनमान सुधारण्यास मदत झाली आहे.’’

‘‘केंद्रीय सहकार मंत्रालयाने केलेल्या उपाययोजनांमुळे सहकार क्षेत्रात व्यापक परिवर्तन होत आहे. अशा वेळी सहकार प्रशिक्षित कर्मचारी वर्गाची गरज भासेल. व्हॅम्नीकॉमसारखी संस्था ही गरज पूर्ण करेल. देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याचे मोदींचे स्वप्न असून ते पूर्ण करण्यासाठी सहकार क्षेत्राने योगदान द्यावे. येत्या काळात लवकरच नवे सहकार विद्यापीठ स्थापन करण्याची कार्यवाही केली जाईल. त्यामुळे प्रशिक्षित मनुष्यबळ उपलब्ध होईल,’’ असेही वर्मा म्हणाले.

 B. L. Varma
Pulses Procurement : तेलबिया, कडधान्य खरेदीच्या एजन्सी नियुक्तीसाठी नवे धोरण

व्हॅम्नीकॉम आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ एकत्रित येऊन काम करत आहे. येथे सुरू केलेली सहकारातील एमबीएची पदवी विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण उपलब्ध झाले आहे. यापुढेही सहकार क्षेत्रात एकत्रित येऊन काम करू, असे आश्वासन या वेळी देण्यात आले.

विद्यार्थ्यांसाठी संगम वसतीगृह

वॅम्नीकॉम ही सहकार क्षेत्रात शिक्षण, प्रशिक्षण, संशोधन आणि सल्ला सेवा देणारी देशातील प्रमुख संस्था आहे. या संस्थेमध्ये प्रशिक्षणासाठी येणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी संगम वसतिगृहाची उभारणी केली आहे. हे वसतिगृह अत्याधुनिक सुविधांनी परिपूर्ण आहे. त्यात ५० कक्ष, ३ व्हीआयपी सुटस उपलब्‍ध आहेत. याशिवाय भोजनालय, ग्रंथालय, प्रशिक्षण कक्ष आणि परिषद दालन आहे. यामुळे प्रशिक्षणार्थींना उत्तम सुविधा प्रदान केल्या आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com