Tawarja River : तावरजा नदीवरील चार बंधाऱ्यांचे बॅरेजेसमध्ये रूपांतर

River Barrage : दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तावरजा नदीवरील उंबडगा, कव्हा, हासाळा व पेठ या चार कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे उच्चस्तरीय बंधाऱ्यात (बॅरेजेस) रूपांत्तर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.
River Barrage
River BarrageAgrowon
Published on
Updated on

Latur News : दोन दिवसापूर्वी झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तावरजा नदीवरील उंबडगा, कव्हा, हासाळा व पेठ या चार कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्यांचे उच्चस्तरीय बंधाऱ्यात (बॅरेजेस) रूपांत्तर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

यासाठीच्या ७१ कोटी रुपये खर्चालाही मंत्रिमंडळाने मंजूरी दिली आहे. यासाठी औशाचे आमदार अभिमन्यू पवार यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश आले असून नदीकाठच्या शेतकऱ्यांना मोठा सिंचनासाठी मोठा फायदा होणार आहे.

River Barrage
Panchganga River Pollution : पंचगंगेचे प्रदूषण रोखण्यासाठी ६०९ कोटींच्या खर्चास मान्यता

दरम्यान सेलू येथील कोल्हापुरी पद्धतीच्या बंधाऱ्याचे बॅरेजमध्ये रूपांतर करण्याचा प्रस्तावदेखील मंजुरीच्या अंतिम टप्यांत असून येत्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यालाही मंजूर मिळणार असल्याचे आमदार पवार यांनी सांगितले. यामुळे तावरजा नदीकाठच्या २० ते २५ गावांना सिंचनासाठी आणि पिण्याच्या पाण्यासाठी फायदा होणार आहे.

औसा तालुक्यात सिंचन सुविधा नसल्यामुळे ३० ते ३५ वर्षापूर्वी तावरजा नदीवर कोल्हापूरी बंधाऱ्यांची शृंखला तयार करण्यात आली होती. या बंधाऱ्यांचे आयुर्मान जास्त झाल्यामुळे फुटतुट झाल्यामुळे निडल्स खराब होणे, दगडी बांधकामामुळे मुख्य भिंतीतून व पायातून पाणी पाझरणे, गेट खराब होणे आदी कारणांमुळे बंधाऱ्यांत पाणी न साठता वाहून जात आहे.

पाच वर्षातील सिंचन व पाणीसाठा आकडेवारीनुसार या बंधाऱ्यांतील पाणीसाठा व सिंचन क्षेत्र निरंक असल्याचे पुढे आले. यामुळे बंधारे पुर्ण झाल्यापासुन सिंचन क्षमतेचा पुर्णक्षमतेने वापर होत नाही. किंबहुना यापैकीही सर्वच बंधारे पूर्णपणे उभारले नव्हते. यामुळे या सर्व बंधाऱ्यांचे बॅरेजमध्ये रुपांतरण करण्यासाठी आमदार पवार यांनी पाठपुरावा केला.

River Barrage
Krushna River : कृष्णा नदीत सोडलं जातयं मळीमिश्रित पाणी; कारवाईची मागणी

बॅरेजेसचा फायदा मोठा

बॅरेजमध्ये रुपांतरण कामात यांत्रिकी पध्दतीचे दरवाजे बसवून पाणीसाठा करणे व पुर परिस्थितीमध्ये कमी वेळात पूर पातळीच्या वर दरवाजे घेऊन पुर विसर्ग करणे याबाबी यांत्रिकी पद्धतीने अतिशय अल्प वेळात करता येतात. यामुळे बंधाऱ्यांत शंभर टक्के शाश्वत पाणीसाठा करणे शक्य आहे.

या बॅरेजच्या रुपांतरण कामात पूर्ण साठवण क्षमतेने दीर्घ कालावधीसाठी मे ते जून महिन्यापर्यंत नदीपात्रात पाणीसाठा झाल्यामुळे सिंचन क्षेत्रात मोठी वाढ होते. बॅरेजेसमध्ये उभ्या उचल पद्धतीचे दरवाजे बसविण्यात येणार असल्यामुळे केंव्हाही गेट उघडून पाणी सोडता येईल आणि केंव्हाही गेट टाकून पाणी अडवता येणार आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com