Thane Market Committee : ठाणे बाजार समितीच्या पुरस्कारांवरून वाद

Market Committee : शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांना यंदा पहिल्यांदाच प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.
Thane Market Committee
Thane Market Committee Agrowon
Published on
Updated on

Kinhavali News: शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने पहिल्यांदाच आयोजित केलेल्या प्रगतशील शेतकरी पुरस्काराला वादाची झळ बसली आहे. तालुक्यातील काही प्रयोगशील शेतकऱ्यांना पुरस्कारातून डावलल्याने त्यांनी निवड समितीवर नाराजी व्यक्त केली आहे.

शहापूर कृषी उत्पन्न बाजार समितीने वार्षिक सर्वसाधारण सभेचे औचित्य साधून शहापूर तालुक्यातील ५४ शेतकऱ्यांना यंदा पहिल्यांदाच प्रगतशील शेतकरी पुरस्काराने सन्मानित केले आहे.

उत्कृष्ट हमाल एक, उत्कृष्ट कर्मचारी एक, विशेष सत्कार एक आणि उत्कृष्ट व्यापारी ११ असे एकूण ६८ पुरस्कार वितरित केले. शहापूर येथे हा कार्यक्रम गुरुवारी (ता. २६) झाल्यानंतर अनेक प्रयोगशील शेतकऱ्यांनी त्या‍वर दहा वर्षांपासून सेंद्रिय पद्धतीने शेती करत आहे.

दरवर्षी शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोगाद्वारे भातपीक, भाजीपाला याचे भरघोस उत्पादन घेतो. याची वेळोवेळी वृत्तपत्रांनीही दखल घेतली आहे. शेतीसारख्या क्षेत्रात गलिच्छ राजकारण चालते याची खंत वाटते. - गुरुनाथ उबाळे, प्रयोगशील शेतकरी, किन्हवली

Thane Market Committee
Yavatnal Market Committee : यवतमाळ बाजार समितीच्या शेडमध्ये व्यापाऱ्यांचाच माल

पुरस्कारासाठी निकषानुसार निवड करण्याची जबाबदारी स्थानिक संचालकांची होती. त्यांच्याकडून शिफारस आली असती, तर नक्कीच विचार केला असता. नंदलाल डोहळे, सभापती, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती नाराजी व्यक्त केली.

अनेक वर्षांपासून आपल्या शेतीत आधुनिक यंत्रसामुग्रीद्वारे संकरीत व सुधारित वाण वापरून भातपिके व भाजीपाला आदी नगदी पिके घेणे, डबघाईस आलेल्या शेती व्यवसायाला चालना देणे, शेतीत वेगवेगळे प्रयोग करून वेळ, श्रम व पैसा वाचविणे आणि शेतकऱ्यांपुढे नवा आदर्श निर्माण करणे, असे उल्लेखनीय कार्य केलेले प्रयोगशील शेतकरी पुरस्कारापासून वंचित राहिले आहेत.

त्यांनी शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक मंडळ व पुरस्कार निवड मंडळावर नाराजी व्यक्त केली आहे. स्थानिक संचालकांनी आपल्या मर्जीतील शेतकऱ्यांची पुरस्कारासाठी निवड केल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

तालुक्यातील अनुसूचित जाती प्रवर्गातील एकाही शेतकऱ्याची निवड न केल्याने प्रचंड नाराजी व्यक्त केली आहे. पुरस्कार वितरण समारंभाला काही ग्रामपंचायत सदस्यांनाही निमंत्रण नसल्याने हा पुरस्कार सोहळा कृषी उत्पन्न बाजार समितीला डोकेदुखी ठरला आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com