Agricultural Issues : माॅन्सूनोत्तर पावसानंतर टोमॅटो लागवडी अडचणीत

Heavy Rains Damage to Agriculture : मागील ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेती पिकांची मोठी दैना झाली. त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, निफाड, दिंडोरी व सिन्नर तालुक्यांतील टोमॅटो लागवडी बाधित झाल्या आहेत.
Tomato Farming
Tomato FarmingAgrowon
Published on
Updated on

Nashik News : मागील ऑक्टोबरमध्ये झालेल्या मॉन्सूनोत्तर पावसामुळे शेती पिकांची मोठी दैना झाली. त्यामध्ये नाशिक, इगतपुरी, निफाड, दिंडोरी व सिन्नर तालुक्यांतील टोमॅटो लागवडी बाधित झाल्या आहेत. नुकसान झाल्याने काही ठिकाणी लागवडी लवकर आटोपल्या आहेत.

तर आता उभ्या असलेल्या लागवडीमध्ये जोरदार पावसामुळे अनेक ठिकाणी झाडांना पाने राहिले नाहीत. तर किडी-रोगांच्या प्रादुर्भावामुळे अडचणीत सापडल्याची स्थिती नाशिक जिल्ह्यातील टोमॅटो उत्पादक पट्ट्यात पाहायला मिळत आहे.

Tomato Farming
Agriculture Issue : प्रचार सभांत शेतीचे प्रश्‍न दुर्लक्षित

पहिल्या टप्प्यात ऑगस्ट व सप्टेंबरमध्ये झालेल्या मुसळधार पाऊस व वाऱ्यामुळे टोमॅटो लागवडींचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते. वाऱ्यामुळे लागवडी भुईसपाट झाल्या, तर लागवडीत रोपांची मर, फुलगळ यासह रोगांचा प्रादुर्भाव वाढलेला दिसून आला. नाशिक, त्रंबकेश्वरसह पूर्व भागातील निफाड व चांदवड तालुक्यात हे नुकसान सर्वाधिक होते.

तर ऑक्टोबरमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सतत पाणी साचून तसेच काही ठिकाणी जमिनी उपळल्यामुळे रोपांच्या बुडाजवळ रोपे सडल्याने मर वाढली. पाने गळून गेल्याने झाडे नावापुरती उभी आहेत. दोन ते तीन महिने चालणाऱ्या लागवडी अडचणीत आल्या. नागपंचमीपासून टप्प्याटप्प्याने लागवडी होत असतात.

Tomato Farming
Crop Damage : कोल्हापुरात जोरदार पाऊस; भात, भुईमूग पिकांचे नुकसान

त्यामध्ये ऑक्टोबरमध्ये पावसाने टोमॅटो लागवडीचे नुकसान अधिक झाले. पाऊस उघडून गेल्यानंतर धुके व नंतर पांढरी माशी व अन्य रसशोषक किडींचा प्रादुर्भाव वाढला. अनेक ठिकाणी उत्पादनावर परिणाम होऊन लागवडी टिकण्याचा कालावधी कमी झाला आहे. त्यामुळे

खर्च करूनही अपेक्षित उत्पादकता नसल्याची स्थिती आहे. झाडांवर करपा दिसून येत असून फळधारणा कमी झाल्याने लागवडी बहुतांश ठिकाणी संपल्यात जमा आहे. पाऊस, रोगांच्या प्रादुर्भावाचा शेतकऱ्यांना फटका बसला असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

उपयोजना ठरतील महत्त्वाच्या

हवामानातील बदलांचा फटका बसला आहे. त्यामुळे आगामी काळात बदलत्या हवामानानुसार खतांचे नियोजन व अन्नद्रव्य व्यवस्थापन हा महत्त्वाचा भाग असेल. या रोगांचा प्रादुर्भाव पाहून प्रतिबंधक उपाययोजना करण्याची गरज आहे. ज्या ठिकाणी नवीन लागवडी आहेत, त्या ठिकाणी पडणारी थंडी गृहीत धरून फळांचा आकार व रंग येण्यासाठी कामकाज करणे महत्त्वाचे राहील. असा सल्ला के. के. वाघ कृषी महाविद्यालयाचे सहायक प्रा. तुषार उगले यांनी दिला.

टोमॅटो लागवडीमधील नुकसानीची स्थिती

जोरदार पावसामुळे झाडांची पाने मोठ्या प्रमाणावर तुटली

झाडांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव, झाड गोळा होण्यासह झाडे बाधित

फळांची संख्या कमी त्यात कॅनोपी नसल्याने थेट सूर्यप्रकाश फळांवर पडत असल्याने पक्वता लवकर व फळांची टिकवणक्षमता कमी

काढणीयोग्य क्षेत्रात करपा रोगाचा प्रादुर्भाव

फुलगळ उत्पादकतेवर मोठा परिणाम, रोगाचे ठिपके पडल्याने फळांची प्रतवारी कमी

पावसामुळे फळांवर तडे पडल्याने गुणवत्तेत घसरण

पावसामुळे लागवडीतील पाने खराब होऊन नुकसान वाढले. किडी-रोगांचा प्रादुर्भाव, त्यात फळधारणा कमी झाली. फळांची प्रतवारी घटली आहे. फुटव्यांची संख्या कमी असल्याने फळांची संख्या कमी त्यात आकार, गुणवत्ता नाही.
योगेश्वर बोराडे, टोमॅटो उत्पादक शेतकरी, थेरगाव, ता. निफाड
पावसामुळे टोमॅटोचा अपेक्षित फुटावा झाला नाही. मर रोग तसेच रोपांवर करपा वाढला, फुले आणि फळांची गळ झाली. जे प्लॉट २ ते ३ महिने चालणार होते ते सर्व चालु प्लॉट १५ दिवसात संपले. झालेला खर्च सुद्धा भरून निघणार नाही.
सुनील भिसे, शेतकरी, मोह, ता. सिन्नर

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com