Pomegranate Cultivation : डाळिंब लागवडीत अभ्यासपूर्ण प्रयोगांमध्ये सातत्य

Pomegranate Farming : अरण (ता. माढा) येथे डॉ. अमोल अभिमन्यू पाटील यांची १८ एकर शेती आहे. त्यात सहा एकरावर डाळिंब लागवड आहे. त्यापैकी तीन एकरांवरील १२ वर्षे जुनी लागवड तर तीन एकरांत मागील ६ महिन्यात लागवड केलेली नवीन बाग आहे.
Pomegranate Farming
Pomegranate FarmingAgrowon
Published on
Updated on

Pomegranate Farming Management :

शेतकरी नियोजन

पीक : डाळिंब

शेतकरी : डॉ. अमोल अभिमन्यू पाटील

गाव : अरण, ता. माढा, जि. सोलापूर

एकूण क्षेत्र : १८ एकर

डाळिंब क्षेत्र : ६ एकर

अरण (ता. माढा) येथे डॉ. अमोल अभिमन्यू पाटील यांची १८ एकर शेती आहे. त्यात सहा एकरावर डाळिंब लागवड आहे. त्यापैकी तीन एकरांवरील १२ वर्षे जुनी लागवड तर तीन एकरांत मागील ६ महिन्यात लागवड केलेली नवीन बाग आहे.

याशिवाय ८ एकरावर द्राक्ष आणि ३ एकरावर केळी बाग आहे. अमोल यांनी रसायनशास्त्र विषयात पीएचडी घेतली आहे. तेरा वर्षे महाविद्यालयात सहायक प्राध्यापक म्हणून नोकरी केली. मात्र घरच्या शेतीमध्ये पूर्णवेळ काम करण्यासाठी नोकरी सोडली. सध्या त्यांनी पूर्णवेळ शेतीमध्ये लक्षकेंद्रित केले आहे.

सध्या बागेत नवीन आणि जुन्या लागवड मिळून सुमारे २ हजार झाडे आहेत. बागेत प्रामुख्याने आंबिया बहर धरला जातो. बहर धरल्यापासून ते संपूर्ण विश्रांती कालावधीपर्यंत ठिबकद्वारे रासायनिक खतांचा वापर केला जातो.

जमिनीद्वारे खते दिली जात नाहीत. सेंद्रिय खतांचा वापर केला जातो. बागेसाठी आवश्यक सेंद्रिय खते घरीच तयार केली जातात. तीन एकर लागवडीतून सरासरी २० टन उत्पादन मिळते.

Pomegranate Farming
Pomegranate Processing : डाळिंबापासून स्क्वॅश, सरबत, अनारदाना, पावडर

व्यवस्थापनातील बाबी

आंबिया बहरासाठी मागील वर्षी १ डिसेंबर ते १ जानेवारीपर्यंत बाग ताणावर सोडली. हा ताण ८ तास सिंचन देत तोडला.

ताण कालावधीत छाटणी आणि विरळणीची कामे करून घेतली. छाटणी केल्यानंतर बोर्डोचा वापर केला. त्यानंतर ४ दिवसांनी पानगळ करून घेतली.

सिंचन कालावधीत वाफसा स्थितीचा अंदाज घेऊन थोडी वाढ केली.

दर १५ दिवसांच्या अंतराने ठिबकद्वारे १० किलो १८ः४६ः० आणि म्युरेट ऑफ पोटॅश ५ किलो प्रति एकर प्रमाणे मात्रा दिली.

कळी दिसायला सुरुवात झाल्यापासून सेटिंग होईपर्यंत प्रत्येक आठवड्याला कीटकनाशक आणि बुरशीनाशकांच्या प्रतिबंधात्मक फवारण्या घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बाबी

संजीवकांचा वापर पूर्णपणे टाळला जातो.

दोन वर्षांतून एक वेळ प्रति झाड २० किलो प्रमाणे शेणखताचा वापर.

ड्रीपद्वारे दर १५ दिवसांची रासायनिक खतांचा वापर करण्यावर भर.

रासायनिक खतमात्रा वर्षभर थोडी-थोडी विभागून दिल्यामुळे शेवटपर्यंत पाने टिकून राहतात. झाडांमध्ये पुरेसा अन्नसाठा तयार होतो. त्यामुळे कळी किंवा सेटिंग होण्यासाठी वेगळे उपाय करण्याचा आवश्यकता भासत नाही.

विश्रांती कालावधीमध्ये फक्त रासायनिक खते आणि पाणी दिले जाते. या काळात कीटकनाशक आणि बुरशीनाशकांचा वापर कटाक्षाने टाळला जातो.

Pomegranate Farming
Pomegranate Farming : प्रशिक्षित स्थानिक मजुरांमुळे डाळिंब उत्पादकांचा खर्च वाचला

नवीन लागवड केल्यानंतर बहार धरेपर्यंत झाडांवर कोणत्याही रासायनिक फवारण्या घेत नाही. त्यामुळे झाडांमध्ये नैसर्गिक रोगप्रतिकार क्षमता तयार होते.

पावसाळ्यात ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलस यांचा वापर.

मागील १५ दिवसांतील कामकाज

सध्या बागेतील झाडांवर साधारण २०० ग्रॅम वजनाची फळे लागलेली आहेत.

दर १५ दिवसांनी १८ः४६ः०, म्युरेट ऑफ पोटॅश यांचा ड्रीपद्वारे वापर केला.

साधारण १५ मार्चला सेटिंग पूर्ण झाली. तेव्हापासून १५ मेपर्यंत कोणत्याही रासायनिक कीडनाशकांचा वापर केला नाही. मात्र मागील आठवड्यात अवकाळी पाऊस झाल्यामुळे प्रतिबंधात्मक फवारण्या घ्यावा लागल्या.

तापमानात चांगली वाढ झाल्याने ठिबकचा कालावधी वाढविला आहे.

आगामी नियोजन

दर १५ दिवसांनी रासायनिक खतमात्रा देण्यात सातत्य राखले जाईल.

तापमानाचा अंदाज घेऊन वाफसा स्थितीनुसार सिंचन केले जाईल.

पावसाळी स्थितीमध्ये प्रतिबंधात्मक रासायनिक फवारण्या घेतल्या जातील.

साधारण ऑगस्ट महिन्याच्या मध्यात फळे तोडणीस तयार होतील.

डॉ. अमोल पाटील, ९९७५६३३५३५

(शब्दांकन : विरण कुलकर्णी, मोडनिंब)

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com