Dirty Water: गढूळ पाण्यामुळे आजाराची शक्यता

Vasind Water: नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वासिंदमधील घराघरांत पाणीपुरवठा केला जात आहे, पण लाखो रुपयांची पाणीपट्टी मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीच्या आजारांचे सावट आहे.
Dirty Water
Dirty WaterAgrowon
Published on
Updated on

Washind News: नळ पाणीपुरवठा योजनेअंतर्गत वासिंदमधील घराघरांत पाणीपुरवठा केला जात आहे, पण लाखो रुपयांची पाणीपट्टी मिळवणाऱ्या ग्रामपंचायतीच्या दुर्लक्षाने सध्या गढूळ पाण्याचा पुरवठा होत असल्याने साथीच्या आजारांचे सावट आहे.

वासिंद गावाची झपाट्याने वाढणारी लोकसंख्या लक्षात घेता आघाडी सरकारच्या काळात साडेपाच कोटींची वाढीव नळ पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र प्राधिकरणातून मंजूर करण्यात आली होती. या योजनेतील निकृष्ट कामांची मोठी किंमत सध्या वासिंदकरांना चुकवावी लागत आहे, कारण सहा प्रभागांमधील फक्त एकाच पाण्याच्या टाकीवर तीस लाखांची फिल्टर योजना बसविण्यात आली आहे.

Dirty Water
Panchaganga Pollution : मैला, रक्त, काळे फेसाळलेले थेट पाणी पंचगंगा नदीत, प्रदुषण मंडळाकडून पाण्याची चाचणी

यंत्रणेच्या देखभाल, दुरुस्तीकडे ग्रामपंचायतीने दुर्लक्ष केल्याने नागरिकांना गढूळ पाणी प्यावे लागत आहे. अशातच सध्या वासिंद गावाची लोकसंख्या तीस ते पस्तीस हजारांच्या आसपास गेली आहे, नागरी सुविधा पुरविण्यात वासिंद ग्रामपंचायत अपयशी ठरली आहे.

वासिंद गावाजवळ बाराही महिने वाहणारी भातसा नदी आहे. तरीदेखील वर्षभर नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे. अशातच पावसाळा सुरू झाल्याने चहा, कॉफीच्या रंगाचे गढूळ पाणी घरोघरी येत आहे. पाण्यात तुरटी फिरवल्यास माती खाली बसत असल्याने अशुद्ध पाण्याच्या पुरवठ्यामुळे साथीच्या आजारांना सामोरे जावे लागते आहे.

Dirty Water
Water Purification : गढूळ पाणी शुद्ध करा शेवग्याने

पैसे घेऊन पाणीवाटप

वासिंदमधील बहुतेक सोसायटींमध्ये ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांकडून पैसे घेऊन पाणी सोडले जात असल्याच्या तक्रारी आहेत. पाण्याच्या टाकीत पाणी नाही. पाण्याची मोटार बिघडली, पाणीपट्टी भरली नाही, अशी वेगवेगळी कारणे देत सोसायटीमध्ये पाणी सोडले जात नाही.

कोणतीही पूर्वसूचना किंवा नोटिशीशिवाय कर्मचारी मनमानी करत असतात. एखाद्याने पैसे दिल्यास त्यांना जादा वेळ पाणी सोडले जाते. त्यामुळे अशा कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीत गढूळपाणी तसेच कचऱ्याच्या समस्येवर अनेकदा आवाज उठवला आहे. लोकांना गढूळ पाणी प्यावे लागत असल्याचा जाब सरपंचाला विचारला आहे. पण बाकीचे सदस्य उदासीन आहेत.
- विलास जगे, ग्रामपंचायत सदस्य
दरवर्षी पावसाळ्यात वासिंदकरांना गढूळ पाणी प्यायला लागते. यामुळे साथीचे आजार बळावण्याचा धोका वाढला आहे. त्यामुळे ही समस्या सोडवण्यासाठी ग्रामपंचायतीने लक्ष दिले पाहिजे.
- सादिक सय्यद, रहिवासी

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com