Agricultural Export: निर्जलीकरण केलेल्या शेतीमालाचा कंटेनर अमेरिकेला रवाना

Export to USA: शिरूर-हवेलीतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करून फ्लेक्स व पावडर स्वरूपातील तयार उत्पादनांचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना करण्यात आला.
Agricultural Export
Agricultural ExportAgrowon
Published on
Updated on

Pune News: न्हावरे (ता. शिरूर) येथील सुंदरबन फ्रूट्स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग क्लस्टरच्या माध्यमातून शिरूर-हवेलीतील शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे निर्जलीकरण (डीहायड्रेशन) प्रक्रियेद्वारे मूल्यवर्धन करून फ्लेक्स व पावडर स्वरूपातील तयार उत्पादनांचा पहिला कंटेनर अमेरिकेला रवाना करण्यात आला. सुंदरबन फूड क्लस्टर अंतर्गत शेतकऱ्यांच्या या सामूहिक प्रयत्नांचे विविध स्तरातून कौतुक होत आहे.

शेतीत अहोरात्र काबाडकष्ट करून पिकवलेला शेतीमाल पुरेशा बाजारभावाअभावी शेतकऱ्यांना कवडीमोल किमतीने विकावा लागतो अथवा प्रसंगी फेकूनही द्यावा लागतो, ही शेतकऱ्यांची व्यथा लक्षात घेऊन न्हावरे (ता. शिरूर) येथील ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेने पुढाकार घेत खादी आणि ग्रामोद्योग आयोगाच्या माध्यमातून सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमांतर्गत शेतकऱ्यांच्या शेतीमालावर प्रक्रिया करून त्याचे मूल्यवर्धन करण्यासाठी व त्याद्वारे त्यांना रोजगारही निर्माण करण्यासाठी शिरूर-हवेलीतील ४०५ शेतकऱ्यांना एकत्रित करून सुंदरबन फ्रूट्स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग क्लस्टरची स्थापना केली.

Agricultural Export
Alphonso Mango Export : नवी मुंबईतून ८३१ टन हापूसची निर्यात

यात शेतकऱ्यांचा शेतीमाल निर्जलीकरण (डीहायड्रेशन) प्रक्रियेद्वारे सुकवून त्याचे फ्लेक्स तसेच पावडर तयार करण्यात येते. या प्रक्रियेमुळे या शेतीमालाचे मूल्यवर्धन तर होतेच तसेच त्याचा वापर करण्यासाठीचा साठवण कालावधीही (शेल्फलाइफ) वाढला. या दुहेरी फायद्यामुळे शेतकऱ्यांचे पारंपरिक पद्धतीत होणारे नुकसान टाळण्यास मोठी मदत होऊन योग्य मोबदल्यासह रोजगारनिर्मिती झाली.

केंद्रीय सूक्ष्म, लघू व मध्यम मंत्रालयाच्या स्फूर्ती क्लस्टर उपक्रमांतर्गत न्हावरे येथे खादी ग्रामोद्योग आयोगाच्या मदतीने विशेष उद्देशांसाठी शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांच्या समूहासाठी सुंदरबन फ्रूट्स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग क्लस्टर ही उपकंपनी स्थापन करण्यात आली. या द्वारे शेतीमाल उत्पादक शेतकऱ्यांकडून भाजीपाला व फळांवर प्राथमिक निर्जलीकरण प्रक्रिया करून अंतिम निर्जलीकरण प्रकियेसाठी ‘सुंदरबन’मध्ये आणला जातो. तेथे अंतिम निर्जलीकरण प्रकियेनंतर पुढे फ्लेक्स व पावडर स्वरूपात तयार केलेला हा माल आकर्षक पॅकेजिंग करून आनंदघना इंडस्ट्रीजच्या माध्यमातून बाजारात विकला जातो.

Agricultural Export
Grape Export: सांगली जिल्ह्यातून द्राक्षाची निर्यात घटली

आजवर देशांतर्गत बाजारपेठेत विकली जाणारी सुंदरबन प्रकल्पातील ही उत्पादने यावर्षी प्रथमच शेतकऱ्यांच्या शेतीमालाच्या एकूण १२ उत्पादनांसह आकर्षक पॅकिंगमध्ये अमेरिकेच्या विविध मॉलमध्ये विक्रीसाठी पाठविण्यात आली आहेत. यामध्ये शेवगा (मोरिंगा) पावडर, बीट पावडर, भोपळा पावडर, लिंबू, गाजर, मूग, पालक व कांदा, लिंबू व गाजर फ्लेक्स यासह एकूण १२ उत्पादने २०० ग्रॅमच्या व ५० ग्रॅमच्या आकर्षक पाकिटांतून पाठविण्यात आली आहेत. क्लस्टरच्या या यशाबद्दल खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे राज्य संचालक योगेश भामरे, तांत्रिक मार्गदर्शक राजेंद्र शिंदे आदींनी अभिनंदन केले असून सभासद शेतकऱ्यांमध्येही उत्साहाचे वातावरण असल्याचे ग्रामीण तंत्रज्ञान संस्थेचे मार्गदर्शक डॉ. अरविंद शाळिग्राम यांनी सांगितले.

सुंदरबनचे अध्यक्ष गीताराम कदम म्हणाले, की खादी आणि ग्रामोद्योग आयोगाचे राज्य संचालक योगेश भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सूक्ष्म, लघू व मध्यम उपक्रमाअंतर्गत केवळ तीन वर्षांत उभारणीसह उत्पादन कार्यरत करण्यात आलेल्या या सुंदरबन क्लस्टरला तांत्रिक एजन्सी म्हणून राजेंद्र शिंदे यांचे मार्गदर्शन लाभल्यामुळे येथील शेतकऱ्यांचा शेतीमाल प्रक्रिया करून स्थानिक बाजारपेठेबरोबरच कंटेनरद्वारे अमेरिकेसारख्या परदेशी बाजारपेठेतही पाठवणे शक्य झाले आहे.

अमेरिकेमधील अनुभवानंतर लवकरच आम्ही युरोपीय देशामध्येही निर्जलीकरण (डीहायड्रेशन) प्रक्रिया केलेला शेतीमाल पाठविण्यासाठी प्रयत्नशील आहोत. या संपूर्ण प्रकल्पामुळे शेतकऱ्यांच्या शेतीमालाचे मूल्यवर्धन, साठवणक्षमता वाढ, तसेच रोजगार निर्मितीचाही उद्देश साध्य होत आहे.
गीताराम कदम, अध्यक्ष, सुंदरबन फ्रूट्‌स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग क्लस्टर
बाजारात कवडीमोल दराने विकावा लागणाऱ्या अथवा प्रसंगी फेकूनही द्यावा लागणाऱ्या शेतीमालाचे सुंदरबन फ्रूट्स ॲण्ड व्हेजिटेबल प्रोसेसिंग क्लस्टरमुळे मूल्य वाढत असून आम्हाला रोजगार निर्मितीही होत आहे. त्यामुळे आम्हा शेतकऱ्यांना फायदा तर आहेच. मात्र पारंपरिक बाजारपेठेबरोबरच अमेरिकेसारख्या देशात आमचा निर्जलीकरण प्रक्रिया केलेला शेतीमाल जातोय, याचाही मनस्वी आनंदही आहे.
अरविंद शिंदे, शेतीमाल उत्पादक शेतकरी, करंजावणे

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com