Chakan Traffic : चाकण औद्योगिक वसाहतीत सातत्याने वाहतूक कोंडी

Chakan Industrial Area : चाकणला वाहतूक कोंडीचा विळखा घट्ट झाला आहे. वाहतूक कोंडीचे ग्रहण हे कायमचेच लागले आहे.
Chakan Traffic
Chakan TrafficAgrowon

Chakan News : पुणे- नाशिक महामार्गावर तसेच चाकण -तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गावर सातत्याने वाहतूक कोंडी होत आहे. चाकणला वाहतूक कोंडीचा विळखा घट्ट झाला आहे. वाहतूक कोंडीचे ग्रहण हे कायमचेच लागले आहे.

अनेक वर्षे गेली आता नवीन वर्ष आले तरी हे ग्रहण काही सुटत नाही, अशी भयानक अवस्था आहे. वाहनांच्या अगदी एक, दोन, तीन, कधी पाच किलोमीटर रांगा लागत आहे. त्यामुळे नागरिक, प्रवासी, कामगार, विद्यार्थी, उद्योजक, व्यावसायिक सारेच संतप्त झाले आहेत.

Chakan Traffic
Pune APMC : पुणे बाजार समिती वाहतूक कोंडीच्या विळख्यात

चाकण (ता. खेड) येथील बाह्यवळण मार्ग हा गेल्या अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत आहे. तो ‘पीएमआरडीए’च्या लालफितीत अडकला आहे. वाहतूक कोंडीला राजकारणाची किनार ही लागली आहे.

वाहतूक कोंडीवरून कोण निवडणुका जिंकतो आहे तर कोण पराभूत होतो आहे. त्यामुळे विविध पक्षाच्या राजकारणात ही वाहतूक कोंडी सापडली आहे. पण यात सर्वसामान्य माणूस, कामगार वर्ग, उद्योजक, विद्यार्थी सारेच भरडले जात आहेत.

Chakan Traffic
Sugarcane Rate : कुमठ्यात ऊस वाहतूक रोखल्‍याने वाहतूक कोंडी

पुणे- नाशिक महामार्गाचे नाशिक फाटा ते चांडोली, राजगुरुनगर हे काम होणार आता मंजूर झाले असे वारंवार काही नेत्यांकडून सांगितले जाते. परंतु या मार्गाचे काम काही होत नाही अशी अवस्था आहे. आता मंजुरी नको प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, असे नागरिकांचे म्हणणे आहे. कोंडीमुळे नागरिक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी यामध्ये तीव्र असंतोष आहे.

केंद्रीय मंत्र्यांकडे विनवणी

खेड तालुक्यातील चाकण औद्योगिक परिसरात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यापूर्वी दोन वेळेस येऊन गेले. त्या वेळेस काही पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी पुणे- नाशिक महामार्ग, चाकण- तळेगाव, चाकण- शिक्रापूर मार्गाच्या कामाबाबत त्यांना भेटून निवेदने दिली. मंत्री गडकरी यांनी त्या वेळेस आश्वासने दिली. परंतु नुसता आश्वासनांचा पाऊस पडत आहे.

पुणे -नाशिक महामार्गाचे काम लवकरात व्हावे. चाकण, तळेगाव, शिक्रापूर मार्गाचे काम लवकर व्हावे, अशी मागणी नागरिकांची आहे. परंतु प्रत्यक्षात कामाला काही सुरुवात होत नाही. यामुळे नागरिक, वाहन चालक, उद्योजक, कामगार, विद्यार्थी, प्रवासी, व्यावसायिक यांच्यामध्ये तीव्र नाराजीचा सूर आहे. या वाहतूक कोंडीत अनेकवेळा रुग्णवाहिका अडकून रुग्णांचे जीवही जात आहेत, असे भयानक वास्तव आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com