APMC Land : बाजार समितीची जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालण्याचा डाव

Chhatrapati Sambhajinagar APMC : कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजी नगरच्या गट नंबर १२ व १३ मधील २० एकर जमिनी बाबत बाजार समिती सभापती व संचालक मंडळाच्या भूमिकेविषयी श्री काळे यांनी शनिवारी (ता. ३) पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला.
APMC
APMCAgrowon

Chhatrapati Sambhajinagar News : बाजार समितीचे सभापती राधाकिसन पठाडे व त्यांच्या गटाचे संचालक मंडळ न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निर्णय घेऊन बाजार समितीची जमीन खासगी बिल्डरच्या घशात घालून बाजार समितीचा तोटा करीत, असल्याचा आरोप बाजार समितीचे माजी सभापती तथा संचालक जगन्नाथ काळे यांनी केला.

कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजी नगरच्या गट नंबर १२ व १३ मधील २० एकर जमिनी बाबत बाजार समिती सभापती व संचालक मंडळाच्या भूमिकेविषयी श्री काळे यांनी शनिवारी (ता. ३) पत्रकार परिषद घेऊन हल्लाबोल केला. श्री काळे म्हणाले, की उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगरची गट नंबर १२ व १३ मधील २० एकर जमीन संबंधी त्यांचे वडील वैजनाथराव काळे हे सभापती असताना सर्वोच्च न्यायालयामध्ये केस दाखल केली होती.

APMC
APMC Election : बाजार समितीवर मंत्री अब्दुल सत्तारांचे एकहाती वर्चस्व

त्यानंतरचे सभापती शब्बीरखा पटेल, पंकज फुलफगर, राजू शिंदे आदींनी देखील या जमिनी बाबत न्यायालयात जाऊन विरोध विरोध करत ती जमीन खासगी बिल्डरच्या ताब्यात जाऊ दिली नाही. राज्य शासनाने जगन्नाथराव काळे यांची बाजार समिती सभापती पदी नेमणूक केल्यानंतर त्यांनी ती जमीन न्यायालयाच्या आदेशानुसार उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समिती छत्रपती संभाजीनगर यांच्या नावे केली.

APMC
Parbhani APMC : परभणी बाजार समितीत हमाली दरवाढ प्रश्न निकाली

जमिनीचा सातबारा उच्चतम कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नावे करण्यामागे बाजार समितीने आपल्या मालकीचे गाळे तयार करून भाडेतत्त्वावर देऊन बाजार समिती आर्थिक दृष्ट्या सक्षम व्हावी ही त्यामागील भूमिका होती.

परंतु, विद्यमान सभापती श्री. पठाडे व त्यांचे गटाचे संचालक मंडळ ती जमीन न्यायालयाच्या आदेशाविरुद्ध निर्णय घेऊन खासगी बिल्डरच्या घशात घालून कृषी उत्पन्न बाजार समितीचा तोटा करत असल्याचा आरोप श्री काळे यांनी पत्रकार परिषदेतून केला. या पत्रकार परिषदेला बाजार समितीचे संचालक अब्दुल रहीम यांचीही उपस्थिती होती.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com