Ethanol Export: इथेनॉलची देशांतर्गत गरज पाहूनच निर्यातीचा विचार करा

Union Food Minister Pralhad Joshi: केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी इथेनॉल निर्यातीबाबत सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले असले, तरी उद्योगातून मात्र अगोदर पुरेसे इथेनॉल तयार करा, मगच निर्यातीचा विचार करा, असा सल्ला देण्यात येत आहे.
Minister Pralhad Joshi
Minister Pralhad JoshiAgrowon
Published on
Updated on

Kolhapur News: केंद्रीय अन्नमंत्री प्रल्हाद जोशी यांनी इथेनॉल निर्यातीबाबत सरकारचा प्रयत्न असल्याचे म्हटले असले, तरी उद्योगातून मात्र अगोदर पुरेसे इथेनॉल तयार करा, मगच निर्यातीचा विचार करा, असा सल्ला देण्यात येत आहे. श्री. जोशी यांनी नुकतेच इथेनॉल निर्यातीबाबत भाष्य केले होते. या पार्श्‍वभूमीवर देशातील गरज पाहून निर्णय घ्यावेत, असा सल्ला इथेनॉल उद्योजकांनी दिला.

उत्पादन क्षमता वाढली असली, तरी २० टक्के मिश्रणाचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी अजूनही काही प्रमाणात इथेनॉलची गरज भासेल. निर्यातीसाठी पुरेसा ‘अतिरिक्त साठा’ नियमितपणे उपलब्ध राहील का, हे एक आव्हान आहे. भविष्यात पेट्रोलची मागणी वाढली किंवा इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण आणखी वाढवण्याचा विचार झाला तर हा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो.

Minister Pralhad Joshi
Ethanol Import: इथेनॉल आयातीवरून साखर उद्योग अस्वस्थ

आंतरराष्ट्रीय इथेनॉल बाजारपेठेत ब्राझील आणि अमेरिका हे प्रमुख देश आहेत. त्यांच्याशी स्पर्धा करणे, योग्य किंमत मिळवणे आणि जागतिक मागणी पूर्ण करणे हे एक मोठे आव्हान असेल. जागतिक बाजारातील इथेनॉलच्या किमती आंतरराष्ट्रीय कच्च्या तेलाच्या आणि कृषी मालाच्या किमतींवर अवलंबून असतात.

इथेनॉलच्या मोठ्या प्रमाणावर निर्यातीसाठी योग्य साठवणूक, वाहतूक आणि लॉजिस्टिक्स (बंदरे, विशेष टँकर्स) या आवश्‍यक पायाभूत सुविधांसाठी मोठ्या गुंतवणुकीची गरज आहे. अन्नधान्यापासून इथेनॉलनिर्मिती वाढल्याने त्याचा अन्नधान्य उपलब्धतेवर आणि किमतींवर परिणाम होऊ शकतो, ज्यामुळे अन्नसुरक्षेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता आहे.

Minister Pralhad Joshi
Ethanol Policy: धान्यापासून मद्यार्क धोरण जाहीर

देशाची इथेनॉलबाबतची सद्य:स्थिती

देशाची इथेनॉल उत्पादन क्षमता १,५८९ कोटी लिटर प्रतिवर्ष (जुलै २०२५ पर्यंत) पोहोचली आहे. २०१४ मध्ये ती ४२१ कोटी लिटर होती. इथेनॉल मिश्रणाला प्रोत्साहन, कच्च्या मालाच्या (ऊस, मका, खराब झालेले तांदूळ) वापराची परवानगी आणि नवीन डिस्टिलरींना आर्थिक प्रोत्साहन यामुळे इथेनॉल उत्पादन वाढले.

भारतातील इथेनॉलचा मुख्य वापर पेट्रोलमध्ये मिश्रण म्हणून होतो. याशिवाय, मद्यार्क उद्योग आणि औद्योगिक कारणांसाठीही होतो. इथेनॉलपुरवठा वर्ष २०२४-२५ मध्ये (जून २०२५ पर्यंत), पेट्रोलमध्ये इथेनॉल मिश्रणाचे प्रमाण १९.९ टक्क्यांपर्यंत पोहोचले, ते २० टक्के मिश्रणाच्या उद्दिष्टाच्या अगदी जवळ आहे.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com