Pune News : नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे नवीन सरकार स्थापन झाल्यानंतर राज्यांना निधी वितरण केला. यामध्ये भाजपाशासित उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आणि मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या नितीशकुमार यांच्या बिहारला भरभरून निधी दिला. मात्र जीएसटीसह सर्व प्रकारच्या कर संकलनातून सर्वात जास्त निधी केंद्र सरकारकला देणाऱ्या महाराष्ट्राच्या तोंडाला निधी वाटपात पाने पुसण्यात आली. पुन्हा एकदा केंद्रातील भाजप सरकारने महाराष्ट्रावर अन्याय केला, अशी टीका महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केला आहे.
पुढे पटोले म्हणाले, देशात सर्वाधिक कराची रक्कम केंद्राला महाराष्ट्र जातो. मात्र निधी वाटपात दुजाभाव केला जात आहे. केंद्रातील नव्या मोदी सरकारने नुकताच राज्यांना विधी वाटप केला. यामध्ये सर्वात जास्त २५ हजार कोटी रुपये उत्तर प्रदेशला देण्यात आले आहेत. तर प्रदेशला १० हजार ९७० कोटी आणि मोदी सरकारला पाठिंबा देणाऱ्या नितीशकुमार यांच्या बिहार राज्याला १४ हजार कोटी रुपयांचा निधी वितरीत केला आहे. मात्र महाराष्ट्राला केवळ ८ हजार कोटी रुपये देऊन, केंद्राने अन्याय केला आहे.
त्यामुळे केंद्रातील भाजपचे सरकार सातत्याने महाराष्ट्राला सापत्नभावाची वागणूक देत आहे. निधी वाटपात महाराष्ट्रासह विरोधी पक्षांचे सरकार असलेल्या राज्यांना निधी कमी देण्यात आल्याचा आरोप देखील पटोले यांनी केला आहे. कर्नाटकामध्ये काँग्रेसचे सरकार असल्याने राज्याला ५ हजार कोटी रुपये दिले आहेत. पंजाबमध्ये आम आदमी पक्षाचे सरकार असल्याने त्यांना फक्त २५२५ कोटी रुपये दिल्याचे पटोले म्हणाले.
तर आत्ताच केंद्रात मोदींना सत्ता स्थापन करण्यासाठी पाठिंबा आंध्र प्रदेशातील चंद्राबाबू नायडू यांच्या पक्षाने दिला. त्यामुळे आंध्र प्रदेशाला ५६२२ कोटी रुपयांचा भरघोस निधी देण्यात आला. हा पैसा सामान्य करदात्याचा असून त्यांच्यासाठीच तो वापरला जातो पण भाजपा सरकार जाणिवपूर्वक निधी वाटपात भेदभाव करून जनतेवर अन्याय करत असल्याचा निशाना पटोले यांनी भाजपवर साधला आहे.
महायुतीचे सरकार अपयशी
मात्र महाराष्ट्रात एनडीएचेच महायुतीचे सरकार असतानाही केंद्राकडून अन्याय केला जात आहे. तर यात राज्यातील महायुतीचे सरकार अपयशी ठरल्याचा टोला पटोले यांनी लगावला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांची पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासमोर बोलण्याची हिंमत नाही. त्यांच्यात राज्यासाठी निधी मागण्याची हिम्मत नाही, असाही घणाघात पटोले यांनी केला आहे.
जे मिळेल त्यातच समाधान
तर मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार दिल्लीतून जे मिळेल त्यातच समाधान मानतात हेच राज्याचे दुर्दैव असल्याचे पटोले यांनी म्हटले आहे. तर महाविकास आघाडीचे सरकार असतानाही केंद्रातील भाजप सरकार जाणीवपूर्वक निधी वितरणात भेदभाव करत होते. महाराष्ट्रावर केंद्रातील भाजपा सरकार करत असलेल्या अन्यायाची नोंद महाराष्ट्रातील जनता घेईल व लोकसभा निवडणुकीत ज्यापद्धतीने त्यांना जागा दाखवली तशीच विधानसभा निवडणुकीतही दाखवतील, असा विश्वास नाना पटोले यांनी दाखवला आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.