Drought Conditions : बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करण्यासाठी काँग्रेसची आंदोलने

Congress Protest : दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत भाव मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (ता. १६) काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली.
Congress Protest
Congress ProtestAgrowon
Published on
Updated on

Buldhana News : दुष्काळ जाहीर करावा, शेतकऱ्यांच्या सोयाबीनला आधारभूत भाव मिळावा आदी प्रमुख मागण्यांसाठी सोमवारी (ता. १६) काँग्रेसच्या वतीने ठिकठिकाणी आंदोलने करण्यात आली. खामगाव, नांदुरा, मलकापूर आदी तालुकास्तरावर काँग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी तहसीलदारांमार्फत शासनाकडे निवेदन पाठवले.

'ॲग्रोवन'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Congress Protest
Crop Damage : बुलढाणा जिल्ह्यातील अतिवृष्टीची नुकसान भरपाई लवकरच मिळण्याची शक्यता

सध्या बाजारपेठांमध्ये सोयाबीन आधारभूत किमतीपेक्षा कमी दराने खरेदी केले जात आहे. सोयाबीनवर येलो मोझॅक या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळे शेतकरी सोयाबीन काढत असताना झडतीचे प्रमाण ४० टक्के कमी लागत आहे. एकरी फक्त ३ ते ४ क्विंटल उतारा मिळतो आहे. त्यामुळे सरकारने दुष्काळ जाहीर करावा. बहुतांश शेतकऱ्यांनी शासनाच्या धोरणाप्रमाणे १ रुपयांचा पीक विम्याचाही भरणा केलेला असून पीकविम्याची हक्काची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात यावी. कोरडा दुष्काळ जाहीर करून मदत द्यावी, अशी मागणी करण्यात आली. खामगाव येथे उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्या मार्गदर्शनाखाली निदर्शने करण्यात आली. यावेळी उपविभागीय अधिकारी ओमप्रकाश पुरी यांना मागण्यांबाबत निवेदन देण्यात आले.

Congress Protest
Sugarcane FRP Protest : पश्चिम महाराष्ट्रात ऊस दराचे आंदोलन चिघळणार; कारखानदारांचे मौन, जिल्हाधिकाऱ्यांनी बोलावलेली बैठक निष्फळ

मलकापूर येथे तहसीलदारांना शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने निवेदन दिल्या गेले. बुलडाणा जिल्ह्यात कोरडा दुष्काळ पडलेला आहे. पाऊस अतिशय कमी झाल्याने शेतकऱ्यांना हमखास साथ देणारे सोयाबीनचे नगदी पीक हातातून गेले आहे. सोयाबीनला आधारभूत किंमत ४६०० रुपये प्रति क्विंटलपेक्षा ५०० ते ७०० रुपये कमी दर मिळत आहे. त्यामुळे बुलडाणा जिल्हा दुष्काळ जाहीर करून पीकविम्याची हक्काची रक्कम व नुकसान भरपाईची मदत तातडीने देण्यात यावी अन्यथा कॉंग्रेस पक्षाच्या वतीने आक्रमकपणे जिल्हाभर रास्तारोको करण्यात येईल, असा इशारा सरकारला दिला.

या वेळी हाजी रशीदखा जमदार, प्रमोद अवसरमोल, राजूभाऊ पाटील, बंडूभाऊ चौधरी, डॉ. अनिल खर्चे, अ‍ॅड. संजय वानखेडे, जाकीर मेमन, कैलास काळे, ज्ञानदेव हिवाळे, हमीद खान, युसूफ खान, वाजिद खान, शेख मेहबूब, ज्ञानेश्वर निकम, दिलीप बगाडे, अजमत जमदार, भुषण सनिसे, प्रतिक जवरे, काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com