Jairam Ramesh On Modi : "कोणावर उपकार केलेले नाहीत"; मोदींच्या पहिल्याच निर्णयावर काँग्रेसचा पलटवार

PM Kisan Samman Nidhi : मोदींनी आपला पदभार स्वीकारताच शेतकऱ्यांच्याबाबतीत पहिला निर्णय घेतला. मात्र हा निर्णय आधीच घ्यायला हवा होता, अशी टीका काँग्रेसकडून करण्यात आली आहे.
PM Narendra Modi
PM Narendra ModiAgrowon

Pune News : नरेंद्र मोदी देशाचे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाले. रविवारी (ता.०९) पंतप्रधानपदाची शपथ घेतल्याबरोबर मोदी सरकार आता ॲक्शन मोडवर आले आहे. सोमवारी (ता.१०) मोदींनी आपल्या कार्यालयाचा ताबा घेतल्याबरोबर पहिली सही शेतकऱ्यांशी संबंधित निर्णयावर केली. मोदींनी किसान निधीचा १७ वा हप्ता जारी केला. तसेच आम्ही शेतकऱ्यांच्या कल्याणासाठी कटिबद्ध आहोत. कृषी क्षेत्रासाठी अधिक काम करत राहू असेही मोदी म्हणाले. त्यावरून आता काँग्रेसकडून टीका केली जात आहे.

मोदी यांच्या पहिल्याच निर्णयावर काँग्रेस नेते जयराम रमेश यांनी जोरदार टीका केली आहे. रमेश यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत ही टीका केली असून ते म्हणाले, 'पंतप्रधानांचे हेडलाईन व्यवस्थापन आणि पीआर टीम तिसऱ्या टर्मच्या पहिल्या दिवसापासून कामाला लागली असल्याची टीका केली आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : मोदींनी कार्यभार स्वीकारताच जारी केला पंतप्रधान किसान सन्मान निधीचा १७ वा हप्ता

तसेच पदभार स्वीकारल्यानंतर मोदींनी पीएम किसान निधीचा १७वा हप्ता देण्यासाठी पहिल्या फाईलवर स्वाक्षरी केली, अशी चर्चा सुरू झाली आहे. पण याआधीचा घटनाक्रम समजून घ्यायला हवा असेही रमेश यांनी म्हटले आहे.

तर पीएम किसान निधीचा १६ वा हप्ता जानेवारी २०२४ मध्ये मिळणार होता. फक्त लोकसभा निवडणुकांचा फायदा घेण्यासाठी तो उशीर करण्यात आला. तो एका महिन्यानंतर देण्यात आला. यानंतर आता १७वा हप्ता देखील वेळेवर देण्यात आलेला नाही. पीएम किसान निधीचा १७वा हप्ता हा एप्रिल/मे २०२४ मध्ये शेतकऱ्यांना मिळणार होता. तो देखील आदर्श आचारसंहिता लागू झाल्याने लांबल्याची टीका रमेश यांनी केली आहे.

PM Narendra Modi
PM Narendra Modi : शेतकऱ्यांचा आशीर्वाद मागण्यासाठी आलेल्या मोदींचा कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या मागणीकडे कानाडोळा

तर आता पंतप्रधानांनी या फाईलवर सही करून कोणावर देखील मोठे उपकार केलेले नाहीत. हे त्यांच्या सरकारच्या धोरणानुसार शेतकऱ्यांचे न्याय्य हक्क आहे. मात्र रोजच्या आणि नित्याच्या प्रशासकीय निर्णयांना मोठे करून दाखवण्याची मोदींना सवय लागली आहे. ते अजूनही स्वत:ला दैवी शक्ती मानतात असा टोला रमेश यांनी लगावला आहे.

तसेच खरोखरच मोदींना शेतकऱ्यांच्या हिताची काळजी असती तर त्यांनी या पाच गोष्टी नक्की केल्या असत्या. त्यात...

योग्य किंमत - स्वामीनाथन सूत्रावर आधारित एमएसपीची कायदेशीर हमी दिली असती

कर्जमाफी - कर्जमाफी योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी स्थायी आयोग नेमला असता

विमा पेमेंटचे थेट हस्तांतरण - पीक नुकसान झाल्यानंतर ३० दिवसांच्या आत खात्यात पैसे थेट हस्तांतरित केले असते

योग्य आयात-निर्यात धोरण - शेतकऱ्यांशी सल्लामसलत करून नवीन आयात-निर्यात धोरण आखले असते

जीएसटी मुक्त शेती - शेतीसाठी आवश्यक असलेल्या सर्व गोष्टींवरील जीएसटी काढून टाकली असती, अशी टीकाही रमेश यांनी केली आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com