Legislative Session 2024 : विधिमंडळात सत्ताधाऱ्यांचा गोंधळ

Monsoon Session : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या विशेष बैठ​कीला विरोधक गैरहजर राहिल्या​च्या मुद्द्यावरून विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ घालत सभागृहांचे कामकाज बंद पाडले.
Legislative session 2024
Legislative session 2024Agrowon
Published on
Updated on

Mumbai News : मराठा-ओबीसी आरक्षणाच्या विशेष बैठ​कीला विरोधक गैरहजर राहिल्या​च्या मुद्द्यावरून विधिमंडळांच्या दोन्ही सभागृहांत सत्ताधारी आमदारांनी अभूतपूर्व गोंधळ घालत सभागृहांचे कामकाज बंद पाडले. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे का, याबाबत विरोधकांनी भूमिका स्पष्ट करावी,

अशी मागणी लावून धरत विधानसभेत सत्ताधारी आमदारांनी विरोधकांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी बोलण्याचा प्रयत्न केला, मात्र तालिका अध्यक्षांनी त्यांना सत्ताधारी आमदारांनाच केवळ बोलू दिल्याने विरोधक शांतपणे हा गोंधळ पाहत होते.

बुधवारी (ता.१०) सकाळी प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर भाजपचे आमदार अमित साटम यांनी विशेष बैठकीला विरोधक कुणाच्या सांगण्यावरून आले नाहीत, असा सवाल करत विषयाला तोंड फोडले. त्यानंतर गोंधळाला सुरुवात झाली.

साटम यांच्यासह आशिष शेलार, नीतेश राणे, संजय कुटे यांनी हाच विषय लावून धरत ज्या ज्येष्ठ नेत्याकडे महाराष्ट्राची धुरा होती त्या वेळी त्यांनी हा प्रश्न का सोडवला नाही, महाविकास आघाडी सरकारचे मुख्यमंत्री फेसबुकवरून बोलत होते.

Legislative session 2024
Monsoon session 2024 : दहाव्या दिवशी मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे मंत्री गायब; विधानसभेत विरोधक आक्रमक

राज्यात मराठा आणि ओबीसींमध्ये भांडणे लावून राजकारण करत असल्याचा आरोप भाजप आमदारांनी केला. त्यानंतर भाजपचे सर्व आमदार वेलमध्ये उतरले. त्यानंतर प्रथम पाच मिनिटे, नंतर १० मिनिटे आणि तिसऱ्यांदा ४५ मिनिटांसाठी कामकाज तहकूब करण्यात आले. ४५ मिनिटांनंतर कामकाज सुरू झाल्यानंततर राम कदम यांना बोलू देण्यात आले.

त्यांनी विजय वडेट्टीवार, जयंत पाटील यांच्यावर टीका केली. विरोधी पक्षनेते सभागृहाबाहेर आरक्षणप्रश्नी विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी करत आहेत. मंगळवारी बैठकीत तोडगा निघेल असे म्हणत होते. मग अचानक बैठकीला जाणे कसे काय रद्द केले, त्यामुळे आता उत्तर दिले नाही तर तुम्ही दुटप्पी आहात हे महाराष्ट्राला सांगू.

Legislative session 2024
Legislative Session 2024 : शक्तिपीठ महामार्ग करणारी कंपनी जावई आहे का?

उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी सत्ताधारी आणि विरोधकांच्या गोंधळात सभागृहाचे कामकाज रेटून नेण्याचा प्रयत्न केला. लोकआयुक्त आणि उप लोकआयुक्तांनी राज्यापालांना ​दिलेला अहवाल, कोल्हापूरमधील शिवाजी विद्यापीठाचा सन २०२२-२३ वर्षाचा साठावा वार्षिक अहवाल, सिडको महानगर -३ प्रकल्पाबाबतची कागदपत्रे, पूरक व पुरवणी मागण्या पटलावर सादर करून परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले.

विधान परिषदेतही गोंधळ

बुधवारी विधान परिषदेत मोठा गदारोळ झाला. सत्ताधारी-विरोधक या वेळी आमनेसामने आल्याने उपसभापती नीलम गोऱ्हे यांना परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब केले. आमदार प्रवीण दरेकर यांनी आरक्षणासंदर्भात औचित्याचा मुद्दा मांडून विरोधकांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला. राज्यात जातीय सलोखा बिघडून गावागावांत जातीय तेढ मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहे.

सर्वच पक्षाच्या नेत्यांसह महाराष्ट्र सरकारने पुढाकार घ्यावा आणि याठिकाणी मार्ग काढावा, अशा प्रकारची भूमिका मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी घेतली होती. सर्वपक्षीय पक्षप्रमुखांना पत्रव्यवहार केला. परंतु, विरोधकांनी आरक्षणाच्या बैठकीवर बहिष्कार टाकला. विरोधकांचे पुतना मावशीचे प्रेम यातून समोर आल्याची टीका ​दरेकर यांनी केली. विरो​धक त्यामुळे चांगलेच आक्रमक झाले. दरम्यान, सत्ताधारी-विरोधक वेलमध्ये आमने-सामने येऊन घोषणाबाजी केल्याने गोंधळ उडाला. दोन्ही बाजूचे आमदार एकत्र आल्याने सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये एक फुटाचे अंतर ठेवा, असे आवाहन करत​ मार्शलला बोलवण्याची​ वेळ उपसभापतींवर आली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com