Land Survey : जमीन मोजणीची शेकडो प्रकरणे प्रलंबित

Agriculture News : शहरातील भूमिअभिलेख कार्यालयात मनुष्‍यबळाअभावी सुमारे चारशेपेक्षा अधिक जमीन मोजणीची कामे प्रलंबित आहे.
Agriculture
Agriculture Agrowon
Published on
Updated on

Karjat News : शहरातील भूमिअभिलेख कार्यालयात मनुष्‍यबळाअभावी सुमारे चारशेपेक्षा अधिक जमीन मोजणीची कामे प्रलंबित आहे. आता पावसाळा सुरू झाल्‍याने मोजणीच्या कामास आणखी विलंब होण्याची शक्‍यता असल्‍याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.

कर्जत तालुका ग्रीन झोन असल्याने येथे आजही शांत, प्रदूषण विरहित निसर्गरम्य वातावरण अबाधित आहे. त्यामुळे धकाधकीच्या जीवनातून वीकेण्ड शांततेत घालवण्यासाठी अनेकजण कर्जतमध्ये सेकंड होमचा पसंती देतात.

Agriculture
Government Land : जमीन सरकारची, भांडतात शेतकरी

याच संकल्पनेतून फार्महाऊस संस्कृती उदयास आली. महाराष्ट्रात सर्वाधिक फार्महाऊस कर्जत तालुक्यात आहेत. त्‍यातच आता कृषी पर्यटन, पंचतारांकित रेस्‍टॉरंटही सुरू झाले आहेत. तालुक्यात जमीन खरेदी-विक्री व्यवहार मोठ्या प्रमाणात होत आहेत. यात मुख्य भूमिका असते भूमिअभिलेख कार्यालयाची.

Agriculture
Land Slides Update : महाडमधील ७२ गावांना दरडींचा धोका

जमीन कोणाच्या नावावर आहे, तिचा सर्व्हे क्रमांक, हद्द, आजूबाजूच्या कोणाची हरकत, संबंधित जागेची मोजणी आवश्यक असते. त्यामुळे जमीनमालक सर्व्हेसाठी कर्जत उपअधीक्षक भूमिअभिलेख कार्यालयात अर्ज करतात. मात्र रिक्त पदे आणि येथील अनागोंदी कारभारामुळे मोजणीची प्रकरणे प्रलंबित राहत आहेत.

जमीन खरेदी करताना अथवा बिनशेती करण्यासाठी, मालकी हक्‍कावरून होणारे दोघांचा वाद मिटवण्यासाठी जमीन मोजणी बंधनकारक आहे. तसेच जमिनीवरील बांधकाम पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र मिळवण्यासाठी बांधकामाची प्लिन्थ मोजणीही बंधनकारक असल्याने भूमी अभिलेख कार्यालयात अर्ज मोठ्या प्रमाणात मोजणीसाठी दाखल होत आहेत.

महिनाभरात एक कर्मचारी जेमतेम पंधरा जमिनीची मोजणी करू शकतो. सध्या दोन कर्मचारी मोजणी करण्याकरिता कार्यालयात आहेत तर दोन पदे रिक्‍त आहेत.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com