Loom Industry : यंत्रमागधारकांच्या समस्यांच्या अभ्यासासाठी लोकप्रतिनिधींची समिती

Dada Bhuse : राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली आहे.
Dada bhuse
Dada bhuseAgrowon
Published on
Updated on

Nashik News : राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम) मंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली लोकप्रतिनिधींची समिती स्थापन करण्यात आली आहे.

याबाबतचा सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागाचा शासन निर्णय लागू करण्यात आला आहे. शासन निर्णयानुसार राज्यातील यंत्रमागधारकांच्या समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीमध्ये माजी मंत्री प्रकाश आवाडे, माजी मंत्री सुभाष देशमुख, विधानसभा सदस्य रईस शेख, अनिल बाबर यांच्यासह विधान परिषद सदस्य प्रवीण दटके हे सदस्य आहेत.

Dada bhuse
यंत्रमाग धारकांच्या वीजबिल सवलत  बंदीच्या निर्णयास तात्पुरती स्थगिती

तर महाराष्ट्र राज्य यंत्रमाग महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक हे समितीचे सदस्य सचिव असणार आहेत. तसेच समिती राज्यातील ज्या विभागात पाहणी दौरा करेल, त्या विभागातील संबंधित प्रादेशिक उपायुक्त (वस्त्रोद्योग) तेथील समन्वयक म्हणून काम पाहतील, असेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.

Dada bhuse
Power Loom Factory Fire : मालेगाव येथे यंत्रमाग कारखाने आगीच्या भक्षस्थानी

...अशी आहे समितीची कार्यकक्षा

- राज्यातील यंत्रमाग बहुल भागातील संघटनेने दिलेल्या निवेदनांच्या अनुषंगाने समस्यांचा अभ्यास करणे.

- समस्यांबाबत यंत्रमागधारकांच्या विविध संघटना/फेडरेशन यांच्याशी चर्चा करणे.

- समस्यांचा अभ्यास करून त्यावर उपाय योजना शासनास सादर करणे.

- वस्त्रोद्योग प्रकल्पांना वीज सवलत योजनेअंतर्गत यंत्रमागधारकांना ऑनलाइन नोंदणी करण्यासाठी येत असलेल्या अडचणींबाबत उपाययोजना सुचविणे.

- यंत्रमाग घटकासाठी अल्पकालीन उपाययोजना सुचविणे.

- राज्य शासनाच्या यंत्रमागासाठीच्या प्रचलित योजनांमध्ये काही बदल सुचवायचा असल्यास त्यानुसार बदल प्रस्तावित करणे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com