Seed Adulteration : भेसळ बियाणेप्रकरणी व्याजासह भरपाई द्यावी

Bogus Seed : एका खासगी सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्याला सोयाबीनचे भेसळयुक्त बियाणे दिल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे.
Bogus Seed Sell
Bogus Seed SellAgrowon
Published on
Updated on

Nanded News : एका खासगी सोयाबीन बियाणे उत्पादक कंपनीने शेतकऱ्याला सोयाबीनचे भेसळयुक्त बियाणे दिल्यामुळे जिल्हा ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दणका दिला आहे. भेसळयुक्त बियाण्यांमुळे झालेल्या नुकसानीपोटी शेतकऱ्याला १८ हजार ९६० रुपये नऊ टक्के व्याजासह द्यावेत. तसेच मानसिक त्रासापोटी २० हजार, तर तक्रारीचा दावाखर्च १० हजार रुपये दीड महिन्याच्या आत द्यावेत, असे आदेश आयोगाने दिले आहेत.

नायगाव तालुक्यातील कांडाळा येथील दत्ता झिंकवाड हे शेतीतून मिळणाऱ्या उत्पादनातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांनी २० मे २०२१ रोजी नरसी येथील वरद कृषी सेवा केंद्राकडून ‘कृषिधन सीड्स’ या कंपनीच्या दोन सोयाबीन बॅगा बियाणे ५ हजार ८०० रुपयांना खरेदी केले.

Bogus Seed Sell
Oil Seed Mission : सरकारच्या अॅक्शन प्लॅनमध्ये तेलबिया मिशनचा समावेश शक्य

या बियाण्याची पेरणी तिफनीने केली. २०२१ वर्षी संपूर्ण जिल्ह्यामध्ये चांगला पाऊस झाला. त्या वर्षाचे हवामान सोयाबीनच्या पिकासाठी अनुकूल होते. त्यामुळे शेतकऱ्याने सोयबीनला लागणारे खत योग्य प्रमाणात दिले. नियमितपणे पिकाची निगराणी करत योग्य काळजी घेतली. परंतु काही दिवसांनी शेतामध्ये वेगवेळ्या प्रकारची रोपे आढळून आली. त्यावरून झिंकवाड यांनी कृषी विक्रेत्यांकडे भेसळ बियाणे दिल्याचे सांगितले.

Bogus Seed Sell
Cotton Seeds Sale : हिंगोलीत खरिपाच्या ३३ हजार क्विंटलवर बियाण्याची विक्री

परंतु तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. यामुळे शेतकऱ्याने नायगाव तालुका कृषी अधिकाऱ्यांकडे १४ सप्टेंबर २०२१ रोजी तक्रार अर्ज दाखल केला. याबाबत कृषी अधिकाऱ्यांनी २३ सप्टेंबर २०२१ रोजी पिकाची पाहणी केली.

कृषी विभागाच्या पंचनाम्यात सोयाबीन पिकाचे ५० टक्के पीक भेसळयुक्त असून शेतकऱ्यांचे ५० टक्के नुकसान होणार आहे, असा अभिप्राय देण्यात आला. याबाबत नुकसानग्रस्त शेतकऱ्याने अनेक वेळा कृषिधन सीड्‌स आणि वरद कृषी सेवा केंद्राकडे नुकसान भरपाईची मागणी केली.

परंतु भरपाई देण्यास नकार दिला. त्यामुळे झिंकवाड यांनी ग्राहक निवारण आयोगाच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती. त्यावर न्यायमूर्ती राहुल पाटील, ज्ञानेश्‍वर पवार व शलाका ढमढेरे यांनी भरपाई देण्याचे आदेश दिले. शेतकऱ्यांची बाजू ॲड. गौतम भद्रे यांनी मांडली. त्यांना ॲड. शेख शकील, ॲड. पी. जी. कसबे, ॲड. सचिन दारवंडे यांनी मदत केली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com