Pik Vima Bharpai : पीकविम्यातून कमी भरपाई मिळणार; स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाईच्या नियमात केंद्राकडून बदल

Crop Insurance Update : पीकविमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. पण केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या नियमात बदल केला. केंद्राने नियम बदलल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मिळणार आहे.
Pik Vima
Pik VimaAgrowon
Published on
Updated on

Pune News : राज्यात काही ठिकाणी जोरदार पावसामुळे खरिपातील मूग, उडीद, सोयाबीन पिकांचे नुकसान होत आहे. मग पावसाने नुकसान झाल्यानंतर पीकविमा योजनेतून भरपाई मिळते का? तर पीकविमा योजनेतून स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकाअंतर्गत विमा नुकसान भरपाई देण्याची तरतूद आहे. पण केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून शेतकऱ्यांना विमा भरपाई देण्याच्या नियमात बदल केला. केंद्राने नियम बदलल्यामुळे शेतकऱ्यांना खूपच कमी भरपाई मिळणार आहे. 

पीक विम्याच्या स्थानिक नैसर्गिक आपत्ती या घटकांतर्गत सध्याच्या परिस्थितीत क्षेत्र जलमय झाल्यास किंवा ढगफुटी झाल्यास पीक विमा भरपाई मिळते. पावसामुळे पाण्याची पातळी वाढून किंवा ओसंडून वाहणारी विहीर किंवा पुराचे पाणी शेतात शिरले किंवा शेतात दीर्घकाळ पाणी साचून राहील्यामुळे पिकाचे नुकसान झाल्यास नुकसान भरपाई मिळते. म्हणजेच स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून तेव्हाच भरपाई मिळेल जेव्हा शेतात साचले किंवा पुराच्या पाण्यामुळे पिकांचे नुकसान झाले असेल. केवळ अतिवृष्टी झाली किंवा जोरदार पाऊस झाला मात्र पिकांचे नुकसान झाले नाही तर भरपाई मिळणार नाही. 

जर तुमच्या शेतात पाणी साचले असेल किंवा पुराच्या पाण्याने पिकाचे नुकसान झाले असेल तर तुम्ही नुकसानीच्या पूर्वसूचना द्यायची आहे म्हणजेच विमा कंपनीके तक्रार करायची आहे. पूर्वसूचना नुकसान झाल्यापासून ७२ तासात द्यायच्या आहेत. नुकसानीची पूर्वसूचना विमा कंपनीला ऑनलाईन करावी. ऑनलाईन तक्रार देता नाही आली तर विमा कंपनीच्या टोल फ्री क्रमांकावर फोन करूनही तक्रार देता येईल. विमा कंपनीचे प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडेही नुकसानीची तक्रार म्हणजेच पूर्वसूचना देता येईल. जर तुम्ही विमा प्रतिनिधी किंवा कृषी विभागाकडे तक्रार देत असाल तर ती लेखी द्या आणि त्याची पोच घ्या. जेणेकरून तक्रार दिल्याचा पुरावा आपल्याकडे असेल. 

जुन्या नियमानुसार भरपाई

स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचे सूत्र सरकारने बदलले आहे. आधी स्थानिक नैसर्गिक आपत्तीत शेतकऱ्यांनी नुकसानीच्या पूर्वसूचना म्हणजेच तक्रारी दिल्यानंतर पूर्वसूचना दिलेल्या सर्वच शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे केले जायचे. तसेच पीक वाढीच्या कोणत्या टप्प्यात नुकसान झाले, यावरून नुकसान भरपाई दिली जायची. 

Pik Vima
Crop Insurance : पीकविम्यावर केंद्राने काढला मार्ग

पीकवाढीनुसार नुकसानभरपाई

पीकवाढीचा टप्पा…भरपाईची टक्केवारी

पेरणी..४५ टक्के

वाढीची अवस्था…६० टक्के

फुलोरा अवस्था…७५ टक्के

पक्वता अवस्था…८५ टक्के

काढणी अवस्था…१०० टक्के

जुन्या नियमात १०० टक्के नुकसान झाल्यास

जर समजा तुमच्या भागात सोयाबीन पिकाचे १०० टक्के नुकसान झाले आणि संरक्षित रक्कम ५० हजार असेल तर आधी कशी भरपाई मिळायची ते पाहू…

पीकवाढीनुसार नुकसानभरपाई

पीकवाढीचा टप्पा…भरपाईची टक्केवारी

पेरणी..४५ टक्के…२२,५०० रुपये

वाढीची अवस्था…६० टक्के…३०,००० रुपये

फुलोरा अवस्था…७५ टक्के…३७,५०० रुपये

पक्वता अवस्था…८५ टक्के…४२,५०० रुपये

काढणी अवस्था…१०० टक्के…५०,००० रुपये

म्हणजेच तुमच्या मंडळातील सर्वच शेतकऱ्यांच्या पिकाचे शेतात पाणी साचून १०० टक्के नुकसान झाले तर आधीच्या नियमानुसार सर्वच शेतकऱ्यांना संपूर्ण विमा संरक्षित रक्कम जी आपण ५० हजार रुपये गृहीत धरली ती मिळाली असती. 

Pik Vima
Crop Insurance Refund : नांदेड जिल्ह्यातील अडीच लाख शेतकऱ्यांना १७९ कोटींचा पीकविमा परतावा

नव्या नियमात घोळ

पण सरकारने ३० एप्रिल रोजी स्थानिक नैसर्गिकआपत्तीतून मिळणाऱ्या भरपाईचा नियम बदलला. आता नुकसान झालेले पीक कोणत्याही अवस्थेत असेल म्हणजेच नुकतीच पेरणी केली असेल, वाढीची अवस्था असेल, पीक फुलोऱ्यात असेल किंवा पक्व होण्याच्या अवस्थेत असेल आणि १०० टक्के नुकसान झाले तरी पूर्ण विमा संरक्षित रक्कम म्हणझेच आपण गृहीत धरलेली ५० हजार विमा संरक्षित रक्कम मिळेल. म्हणजेच पीक कोणत्याही अवस्थेत असेल आणि १०० टक्के नुकसान झाले तर संपूर्ण विमा संरक्षित रक्कम मिळणार. 


शेतकऱ्याला आता २५ टक्केच भरपाई

आता इथपर्यंत आपल्याला शेतकऱ्याचा फायदा दिसतो. पण बदललेल्या नियमात असे म्हटले आहे की, जर त्या मंडळातील २५ टक्क्यापेक्षा जास्त पिकाचे नुकसान झाले असेल तर व्यापक नुकसान म्हणजेच वाईडस्प्रेड नुकसान गृहीत धरले जाईल. जेव्हा नुकसान वाईडस्प्रेडमध्ये बसेल म्हणजेच मंडळातील नुकसाग्रस्त पीक २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल तर त्या मंडळातील शेतकऱ्यांना एकूण नकुसान भरपाईपैकी २५ टक्के रक्कम भरपाई म्हणून आता दिली जाईल आणि उरलेली ७५ टक्के रक्कम पीक कापणी प्रयोगानंतर देय असेल तर दिले जातील. 

उरलेली ७५ टक्के भरपाई मिळेलच असे नाही

तुमच्या मंडळातील पिकाचे नुकसान काही शेतकऱ्याचे झाले म्हणजेच २५ टक्के शेतकऱ्यांचे नुकसान झाले नाही तर येणारी भरपाईची रक्कम तुम्हाला लगेच मिळेल. पण जर तुमच्या मंडळातील पिकाचे नुकसान २५ टक्क्यांपेक्षा जास्त असेल आणि तुम्ही वाईडप्रेडमध्ये गेले तर पूर्ण नुकसान होऊनही आणि कितीही भरपाई रक्कम निश्चित झाली तरी आता केवळ २५ टक्के रक्कम मिळेल. उऱलेली ७५ टक्के रक्कम पीक कापणी प्रयोगातून देय झाली तर मिळेल. म्हणजेच पीक कापणी प्रयोगातून तुमचे उत्पादन किती कमी आले यावरून तुमची उऱलेली भरपाई ठरवली जाईल. जर काहीच रक्कम देय नसेल तर काहीच मिळणार नाही. थोडक्यात अग्रीम भरपाईप्रमाणे सुत्र लागू केले, असे म्हणता येईल. 


नियम बदलण्याची मागणी

म्हणजेच केंद्र सरकारने स्थानिक नैसर्गिक आपत्तीतून भरपाई देण्याचा नियम बदलल्याचा तोटा शेतकऱ्यांना होणार आहे तर फायदा कंपन्यांना होणार आहे. त्यामुळेच सरकारने हा नियम बदलून जुन्या नियमाप्रमाणे मंडळात प्रत्येक शेतकऱ्यांचे ज्या प्रमाणात नुकसान झाले त्या प्रमाणात भरपाई देण्याचा नियम पुन्हा लागू करावा, अशी मागणी शेतकरी करत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com