Mhaisal Irrigation Scheme : ‘विस्तारित म्हैसाळ’च्या कामाला प्रारंभ

Irrigation Scheme : जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना लाभदायक म्हैसाळ विस्तारित योजनेच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे.
Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Irrigation Scheme Agrowon
Published on
Updated on

Sangli News : जत तालुक्यातील वंचित ६५ गावांना लाभदायक म्हैसाळ विस्तारित योजनेच्या कामाला अखेर सुरुवात झाली आहे. बंदिस्त वितरिकेद्वारे येथे पाणीपुरवठा होणार असून पुढील दोन वर्षांत योजना पूर्णत्वास जाईल, असे अपेक्षित आहे. या योजनेला गतवर्षी डिसेंबरमध्ये सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाली होती.

कृष्णा-कोयना उपसा सिंचन प्रकल्पाच्या पंचम सुधारित प्रशासकीय मान्यता अहवालामध्ये सिंचनापासून वंचित गावांना म्हैसाळ योजनेचा लाभ देणे प्रस्तावित करण्यात आलेले होते. या सुप्रमा अहवालास डिसेंबर-२०२२ मध्ये मान्यता मिळाली होती.

त्या अनुषंगाने म्हैसाळ विस्तारित जत उपसा सिंचन योजनेच्या शीर्ष कामांची अंदाजपत्रके तयार करण्यात आली आणि निविदा प्रक्रिया पूर्ण करून अखेरीस यासाठीचा कार्यारंभ आदेश देण्यात आला.

Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Upsa Irrigation Scheme : म्हैसाळला बॅरेजसाठी निविदा प्रसिद्ध

या कामांमध्ये योजनेचे तीन पंपगृह बांधणे, ऊर्ध्वगामी नलिका व गुरुत्वीय नलिकेची कामे करणे प्रस्तावित आहे. मूळ म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक तीनच्या संतुलन जलाशयांमधून पाणी उचलून ५७ किलोमीटरवरील येळदरी येथे जमिनीपासून ७४० मीटर उंचीवर पोहोचविले जाणार आहे.

Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Irrigation : म्हैसाळच्या आवर्तनामुळे दुष्काळी पट्ट्याला दिलासा

यामध्ये ऊर्ध्वगामी नलिकांसाठी १५०० मिलिमीटर व्यासाचे एमएस पाइप व गुरुत्वीय प्रवाही नलिकांसाठी १७०० मिलिमीटर व्यासाचे पीसीसीपी पाइप वापरण्यात येणार आहे. हे पाइप मिरज, कवठेमहांकाळ तालुक्यातून जत तालुक्यापर्यंत जाणार आहेत. या नलिका कामाची आरग व लोणारवाडी येथे सुरुवात करण्यात आली आहे. पाइपचा कार्यक्षेत्रावर पुरवठा सुरू आहे.

Mhaisal Irrigation Scheme
Mhaisal Irrigation Scheme : ‘म्हैसाळ’च्या कामाची राज्यस्तरीय समितीमार्फत चौकशी करा

या गावांना मिळणार लाभ

गुड्डापूर, सोरडी, कुलाळवाडी, आसंगी, तिल्याळ, गोंधळेवाडी, अंकलगी, लमाणतांडा, काराजनगी, बेळोंडगी, बोर्गी खुर्द, दरीकोण्णूर, दरीबडची, लमाणतांडा, खंदनाळ, जालिहाळ खुर्द, पांढरेवाडी, आसंगी तुर्क, धुळकरवाडी, कागनरी, मोटेवाडी, तिकोंडी, पांडोझरी, करेवाडी, भिवर्गी, जालिहाळ बुद्रुक, मोरबग्गी, माणिकनाळ,

अक्कलवाडी, बोर्गी बुद्रुक, हळ्ळी, बालगाव, सुसलाद, सोनलगी, कोनबगी, कोंतेव बोबलाद, करेवाडी (कों.), गुलगुंजनाळ, मोटेवाडी (लवंगा), गिरगाव, वाषाण, निगडी खुर्द, अचकनहळ्ळी, करजगी, कोळगिरी, सिंदूर, बसर्गी, गुगवाड, माडग्याळ, व्हसपेट, संख, सिद्धनाथ, मल्याळ, जत, लवंगा, खोजानवाडी, मुचंडी, उमराणी, उमदी, सोन्याळ, उटगी, रामपूर, बिळूर, खिलारवाडी, साळमळगेवाडी.

लाभक्षेत्र २६,५०० हेक्टर

अतिरिक्त लाभ १० हजार हेक्टरवर

प्रकल्प आराखडा १०२८ कोटी

अन्य विस्तारित कामे स्वतंत्र तरतूद

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com