Cotton Procurement Center
Cotton Procurement CenterAgrowon

Cotton Purchase : ‘सीसीआय’च्या बार्शीटाकळी केंद्रावर कापूस खरेदीस प्रारंभ

J S Cotton Industry : बार्शीटाकळी येथील जे. एस. कॉटन इन्डस्ट्रीज येथे नुकताच सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला.
Published on

Akola News : बार्शीटाकळी येथील जे. एस. कॉटन इन्डस्ट्रीज येथे नुकताच सीसीआयच्या कापूस खरेदीचा शुभारंभ झाला. जिल्ह्यात बार्शीटाकळीसह १० केंद्रांवरून यंदा खरेदी होणार आहे. पुढील आठवड्यात या खरेदीला वेग येणार आहे. यंदा कापसाला ७५२१ रुपयांचा हमीभाव आहे.

कापूस शुभारंभप्रसंगी भारतीय कापूस निगमचे महाराष्ट्र चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक ललितकुमार गुप्ता यांनी फीत कापून रीतसर उद्घाटन केले. यावेळी सीसीआयचे मुख्य प्रबंधक निरजकुमार (अकोला), सहाय्यक प्रबंधक प्रवीणकुमार, केंद्र प्रमुख अभय प्रतापसिंह, पारसचे अंकुश देशमुख, जे.एस.कॉटन इंडस्ट्रीजचे सुबोध गोयनका, जय गोयनका, दयावान कॉटन इंडस्ट्रिजचे संचालक अहमद खान,

Cotton Procurement Center
Cotton Production : कापूस उत्पादकतेत घसरण

कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव सतीश शेळके यांची उपस्थिती होती. महागाव येथील सचिन पोरे, ज्ञानेश्‍वर ढोरे यांचा कापूस विक्रीकरिता आला होता. यानिमित्ताने त्यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी परिसरातील शेतकरी उपस्थित होते.

Cotton Procurement Center
Cotton Market : कापूस बाजारात सुधारणेचे संकेत

शासकीय कापूस खरेदी सुरू झालेली आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीकडे कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी नोंदणी करावी. नोंदणी करताना मोबाईल नंबर जोडलेले आधार कार्ड, सातबारा आणावा, असे आवाहन बाजार समितीचे सचिव सतीश पाटील यांनी केले.

शेतकऱ्यांनी सीसीआय केंद्रात कापूस विक्रीस आणावा. यावर्षी मागील वर्षापेक्षा ५०० रुपये जास्त आहे. म्हणून या वाढीव दराचा लाभ तालुक्यातील शेतकऱ्यांनी घ्यावा.
ज्ञानेश्वर ढोरे, युवा शेतकरी, महागांव, ता.बार्शीटाकळी

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Agrowon
agrowon.esakal.com