Water Supply: श्रमदानातून झाली पाण्याची वाट मोकळी

Community Effort: एखाद्या सामाजिक कामासाठी एकत्र आल्यास कोणतेही काम अवघड नसते. याचा प्रत्यय नुकताच जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरातील शेतकऱ्यांना आला.
Rural Development
Rural DevelopmentAgrowon
Published on
Updated on

Baramati News: एखाद्या सामाजिक कामासाठी एकत्र आल्यास कोणतेही काम अवघड नसते. याचा प्रत्यय नुकताच जिरायती भागातील उंडवडी सुपे परिसरातील शेतकऱ्यांना आला. शेतकऱ्यांनी एकत्र येत कालव्यात पडलेला दगड-गोट्यांचा ढीग बाजूला केल्याने अडथळा निर्माण झालेल्या पाण्याला वाट मोकळी मिळाली.

Rural Development
Water Supply Scheme : पाइपलाइन टाकण्याचे काम रेंगाळल्याने अडचण

शिरसाई उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन मागील पंधरवड्यापासून बारामती जिरायती भागातील शिरसाईच्या लाभार्थी गावात सुरू आहे. चार दिवसांपूर्वीच खराडेवाडी हद्दीत या योजनेवरील मुख्य उजव्या कालव्यात खोल ठिकाणी दगड- गोठ्यांचा ढिगारा कोसळून कालव्यातील पाण्याला अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे कारखेल, खराडेवाडी, सोनवडी सुपे, जळगाव सुपे, अंजनगाव आदी

Rural Development
Farmer Son Success: शेतकरीपुत्र प्रदीप आंबरेची यशाला गवसणी

गावांना पाणी पोचण्यास मोठा अडथळा निर्माण झाला होता. तसेच त्याठिकाणी खोलगट व अरुंद कालव्याचा भाग असल्यामुळे जेसीबी मशिन किंवा ट्रॅक्टरचा वापर करणे देखील शक्य नव्हते. अशावेळी मनुष्यबळाने काम करण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. ऐनवेळी तातडीने मजूर उपलब्ध होणे देखील जिकिरीचे झाले होते. ही बाब शिरसाई योजनेचे कनिष्ठ अभियंता अमोल शिंदे यांनी शेतकऱ्यांच्या लक्षात आणून दिली.

दरम्यान, आठ ते दहा शेतकऱ्यांनी एकत्रित येत सोमवारी (ता. २७) दुपारी कालव्यातील पाण्यात उतरून दगड-गोठे तासाभरात बाजूला केले. या श्रमदानात मधुकर भोसले, विठ्ठल जगताप, सचिन वावगे, योगेश जगताप, दादासाहेब मोरे, ज्ञानदेव पवार, संपत भापकर, विकास वावगे आदी सहभागी झाले होते. अडथळा दूर झाल्यामुळे पुढील गावांचा पाणीपुरवठा सुरळीत होण्यास मदत झाली.

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon - Agriculture News
agrowon.esakal.com