PM Kisan : ‘किसान योजनेसाठी कागदपत्रांची जुळवणी करा’

PM Kisan Scheme : पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एक डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली आहे.
PM Kisan
PM KisanAgrowon
Published on
Updated on

Poladpur News : तालुक्यातील ज्या शेतकऱ्यांनी नव्याने प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेसाठी अर्ज केला आहे. मात्र अद्यापही सदरील रक्कम त्‍यांच्‍या खात्यावर जमा झालेली नाही, अशा शेतकऱ्यांनी पुन्हा आपले फॉर्म नव्याने भरून त्‍यात दुरुस्‍ती करावी. तसेच उपयुक्‍त कागदपत्रे जोडावी, असे आवाहन तालुका कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.

पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना एक डिसेंबर २०१८ पासून देशात लागू करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत देशातल्या शेतकऱ्यांना प्रतिवर्ष सहा हजार रुपयांचा आर्थिक मदत दिली जाते. सरकारने सुरुवातीला दोन हेक्टरपर्यंत शेतजमीन असलेल्या शेतकऱ्यांचा या योजनेत समावेश केला होता.

PM Kisan
PM Kisan and Namo Yojana : 'पीएम किसान’चा १८ वा आणि ‘नमो’चा पाचवा हप्ता खात्यात जमा

पण, नंतर या योजनेची व्याप्ती वाढवून सगळ्याच शेतकऱ्यांना या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत प्रतिवर्ष चार महिन्यांच्या अंतराने दोन हजार रुपयांचे तीन हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केले जातात. पोलादपूर तालुक्यातील सर्व शेतकरी बांधवांनी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेसाठी अर्ज केले आहेत.

PM Kisan
PM Kisan Scheme : चिपळूण तालुक्यात ‘पीएम किसान, नमो सन्मान’चे १८०० शेतकऱ्यांचे अर्ज रद्द

मात्र या योजनेतील कागदपत्रे आता ऑनलाईन व ऑफलाईन प्रत्यक्ष तपासणी करणे शासनाने बंधनकारक केले आहे. त्‍यामुळे शेतकरीवर्गाला पुन्‍हा नव्याने अर्ज करून त्‍यामध्ये शासनाने दिलेल्या कागदपत्रांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले आहे.

यामध्ये अर्ज करताना कागदपत्रे ऑनलाइन अपलोड करावी लागणार आहेत. तसेच अर्जदाराच्या नावावर असलेला फेरफार, जर वारसाहक्काने जमीन एक फेब्रुवारी २०१९ नंतर नावावर झाली असल्यास तसा पुरावा द्यावा लागणार आहे. सात बारा, मुलांचे आधारकार्ड, अपलोड करणे आवश्यक आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com