Illegal Fishing : तटरक्षक दलाने रोखली अवैध मासेमारी

Fisheries : बंदी असूनही आक्षी साखर गावातील काही मच्छीमार एलईडी व पर्सनेट मासेमारी करतात.
Illegal Fishing
Illegal FishingAgrowon

Murud News : बंदी असूनही आक्षी साखर गावातील काही मच्छीमार एलईडी व पर्सनेट मासेमारी करतात. मुरूड येथील तटरक्षक दलाने कारवाई करून त्‍यांच्या ताब्‍यात घेतल्‍या. खोल समुद्रात टेहळणी करताना तटरक्षक दलाला काही बोटी आढळल्‍या. यात चार एलईडी बोटी तर सहा पर्सनेट जाळ्याद्वारे मासेमारी करणाऱ्या बोटींचा समावेश असल्‍याची माहिती मुरूड पोलिसांनी दिली.

पकडलेल्‍या १० बोटीआगरदांडा बंदरात आणल्या असून बोटींवर मासेमारी करणाऱ्यांचे साहित्‍य, इतर सामुग्रीचे पंचनामे करण्यात आले आहेत. बोटीवर काम करणाऱ्या सर्व मच्छीमारांची पोलिस कसून चौकशी करीत आहेत.

Illegal Fishing
Fishery Business : मच्छीमारी व्यवसाय अडचणीत

काही दिवसांपूर्वी एकदरा परिसरात मासेमारी करणाऱ्या मच्छीमारांना आक्षी-साखर येथील एलईडी मासेमारी करणाऱ्या बोटीतील मच्छीमारांनी मारहाण केली होती. यावेळी मुरूड तालुक्यातील मच्छीमारांनी एकत्र येत मोर्चा काढून त्यांच्यावर कार्यवाही करण्यास भाग पाडले होते.

ही घटना ताजी असताना आता तटरक्षक दलाने टेहळणी करताना, नानवेल दीपगृहासमोर बोटी पकडल्‍या आहेत. बोटींवर कारवाई केल्‍याने स्‍थानिक मच्छीमारांमधून समाधान व्यक्‍त होत आहे.

Illegal Fishing
Fisheries Scheme : मत्स्यपालनासाठी कर्ज आणि प्रशिक्षणाची केंद्र सरकारची योजना

एलईडी पद्धतीने मासेमारी करणाऱ्यांना मुबलक मासे मिळत असल्‍याने पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्‍यामुळे तटरक्षक दलाकडून नियमित कारवाई झाल्‍यास एलईडी, पर्सनेट मासेमारीला आळा बसेल, अशी मागणी स्थानिक मच्छीमारांकडून करण्यात येत आहे.

मत्‍स्‍य प्रजाती नष्‍ट

बंदी असतानाही रायगड जिल्ह्यात विशेषतः मुरूड, उरण समुद्रात पर्सनेट मासेमारी होते. याबाबत अनेकदा मत्स्यविभागाला माहिती असते, मात्र कारवाईकडे दुर्लक्ष होत असल्‍याने स्‍थानिक मच्छीमार सांगतात.

बेकायदा मासेमारीमुळे अनेक मत्स्य प्रजाती नष्ट झाल्या आहेत. गेल्या काही वर्षांपासून सुरू असलेल्या बेसुमार मासेमारीमुळे तारली, दाढा, सफेद कोलंबी, नल, तेल बांगडा यांसारख्या प्रजाती नष्ट झाल्या आहेत, तर सुमारे ४० धोक्‍यात आहेत.

खोल समुद्रात एलईडी, पर्सनेट पद्धतीने मासेमारी करणाऱ्या दहा बोटींवरील १०३ खलाशांवर कारवाई करण्यात आली आहे. ही मोहीम पुढेही सुरूच ठेवणार आहे.
- तुषार वाळुंज, परवाना अधिकारी, मत्स्यविकास मुरूड

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com