महाराष्ट्र ग्रामीण उपजीविका परिषद विशेषशाश्वत ग्रामीण उपजीविकेसाठी हवामान अनुकूल उद्यमशीलता या विषयावरील चर्चासत्रात प्रादेशिक असमतोलता, पशुधन, जमीन सुपीकता अशा मुद्द्यांवर तज्ज्ञांनी मते मांडली. नैसर्गिक परिसंस्थांची काळजी घेत नैसर्गिक स्रोत व्यवस्थापन पद्धतीद्वारे पुढे जावे लागेल. त्याच वेळी पशुपालन, दुग्धविकास, एकात्मिक नैसर्गिक शेतीच्या आधारे हवामान अनुकूल जीवन पद्धतीचा अंगीकार ग्रामीण आणि कृषी व्यवस्थेला करावा लागेल, असेही तज्ज्ञांनी सूचित केले. .प्रादेशिक असमतोलताउपजीविकांच्या समस्यांना प्रादेशिक असमतोलता कशी कारणीभूत ठरते याविषयी कुलगुरू डॉ. विनायक देशपांडे यांनी विश्लेषण केले. ते म्हणाले, की समृद्धी व वंचितता अशा दोन्ही बाबी या राज्यात एकाचवेळी दिसतात. बहुआयामी दारिद्र्याची व्याप्ती राज्यात मोठी आहे. दांडेकर समितीनंतर केळकर समिती आली. मात्र असमतोलता हटलेला नाही. या राज्याचे भाषेच्या आधारे एकीकरण झाले, परंतु प्रादेशिक विकासाकडे दुर्लक्ष झाले. त्यातून ग्रामीण उपजीविकेचे प्रश्न वाढत गेले आहेत.डॉ. विनायक देशपांडे.Livelihood Sector Development: स्वयंसेवी संस्थांच्या यशोगाथांचा विस्तार व्हावा.ग्रामविकासात‘नाबार्ड’चा हातभारराज्यात नाबार्डचे अर्थसाह्य आता ३१ हजार कोटींच्या पुढे गेले आहे. पायाभूत ग्रामविकासात या निधीचा मोठा हातभार लागत असल्याचे नाबार्डचे महाव्यवस्थापक प्रदीप पराते म्हणाले, की नाबार्डने आतापर्यंत २.९४ लाख कोटी रुपये राज्याच्या विकासासाठी दिले आहेत. सिंचन, मृद्संधारण रस्ते, कृषी पुनर्वित्तमध्ये नाबार्ड उल्लेखनीय काम करते आहे. एफपीओची संकल्पना नाबार्डनेच प्रथम मांडली होती.प्रदीप पराते.स्थानिक पातळीवर उद्यमशीलता हवी‘स्वयंम शिक्षण प्रयोग’च्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नसीम शेख यांनी हवामान अनुकूल शेतीवरील उपजीविकेतील महिलांचे नेतृत्व उलगडून सांगितले. त्या म्हणाल्या, की महिलांचे सक्षमीकरण व नेतृत्वविकास झाला पाहिजे. नियोजनात महिलांना प्राधान्य दिल्याशिवाय शेतीचा विकास होणार नाही. यापुढे केवळ शेतीवर शेतकरी कुटुंब जगू शकत नाही. त्यांना स्थलांतरित व्हावे लागेल. स्थलांतरामुळे शहर आणि शेतकऱ्यांनाही समस्येला तोंड द्यावे लागते. त्यामुळे स्थानिक पातळीवर उद्यमशीलतेचा पर्याय देणे योग्य राहील.नसीम शेख.Rural Livelihood Report: राज्याचा ग्रामीण उपजीविका अहवाल आज प्रसिद्ध होणार.घटणारा सेंद्रिय कर्ब ही धोक्याची घंटानानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाचे मृदा विज्ञान विशेषज्ञ विजय कोळेकर म्हणाले,की राज्यात जमिनीतील घटणारा सेंद्रिय कर्ब ही धोक्याची घंटा आहे. शेतजमिनीची भयानक धूप हा मोठा धोका आहे. तापमानवाढीमुळे उत्पादकता कमी होत आहे. त्यामुळे शासनाने हवामान अनुकूल शेतीचे कृषी संजीवनी मॉडेल तयार केले आहे.विजय कोळेकर.दुग्धोत्पादनात राज्य पिछाडीवर‘बाएफ’चे अध्यक्ष भरत काकडे म्हणाले, की राज्याचे दुग्धोत्पादन १६ दशलक्ष टनांवर गेले आहे. मात्र राष्ट्रीय सरासरी दुग्धोत्पादनात राज्य अजूनही पिछाडीवर आहे. डेअरी क्षेत्रामुळे राज्यात ८० लाख लोकांना रोजगार मिळतो. त्यामुळे या क्षेत्रातील कमी उत्पादकता, चारा टंचाई, पशुखाद्याच्या वाढत्या किमती या समस्या प्रभावीपणे हाताळाव्या लागतील. लिंगनिश्चित रेतमात्रा कमी किमतीत उपलब्ध झाल्यास कालवडी वाढविण्याची संधी शेतकऱ्यांना अधिक मिळेल.भरत काकडे.Tribal Livelihood : रानमेवा विक्रीतून आदिवासींना हंगामी रोजगार.वनोपजाकडे नको दुर्लक्षविदर्भ नेचर कंझर्व्हेशन सोसायटी संस्थापक दिलीप गोडे यांनी शेतीचा खर्च जास्त असलेल्या भागात आत्महत्यांची समस्या जास्त असल्याचे निरीक्षण नोंदविले. ते म्हणाले, की मत्स्यपालन, वनोपज, जोडधंदा आधारित शेती यामुळे काही गावांमध्ये गरिबांच्या जीवनात क्रांती आणली आहे. त्याचा विस्तार व्हायला हवा. देशात अजूनही ३० कोटी लोक वनोपज गोळा करतात. राज्यात २०.१४ टक्के लोक वन भूभागाभोवती राहतात. त्यांचे ४० ते ६० उत्पन्न हे वनोपजातून येते. आम्ही समूह नियोजनातून तेंदुपत्त्यांचा लिलाव करीत असून, विक्रीपूर्वीच आगाऊ पैसा स्थानिकांच्या खात्यात जमा करण्यास यशस्वी झालो आहोत. त्यामुळे उपजीविकेचे प्रभावी माध्यम असल्याने वनोपजाकडे दुर्लक्ष नको.भरत काकडे.शास्त्रोक्त शेतीची गरज‘वॉटर’चे कार्यक्रम व्यवस्थापक डॉ.नितीन कुंभार म्हणाले, की संस्थेचे काम ७० लाख लोकांपर्यंत पोहोचले आहे. विकासासाठी वृक्षतोड वाढली असून जैवविविधता धोक्यात आल्याने काही प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. मानवी स्थलांतर वाढत आहे. त्यामुळे परिसंस्थेमधील स्त्रोतांचा सुयोग्य वापर करावा लागेल. पर्यावरण संवर्धन केले तरच उपजीविकेचे मार्ग टिकून राहतील. शाश्वत उपजीविका हवी असल्यास जल सुरक्षितता, जमीन सुपीकता हवी. यापुढे केवळ शास्त्रोक्त सल्ल्यावर आधारित शेती पद्धत स्वीकारावी लागेल.डॉ.नितीन कुंभार.एकात्मिक पद्धतीची गरजमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख म्हणाले, की सतत एक पीक घेतल्यामुळे उत्पादकता घटली आहे. कपाशी, सोयाबीन नगदी पिके अत्यावश्यक झाली आहेत. त्यालाही पर्याय शोधावे लागतील. प्रत्येक पिकात नवीन वाण द्यावे लागेल आणि पीक पद्धतीदेखील सतत बदलती ठेवावी लागेल. केवळ पीक किंवा पशुधनावर आधारित जीवन पद्धती यापुढे टिकणार नाही. एकात्मिक पद्धत स्वीकारावी लागेल. राज्याला एकात्मिक व निसर्गपूरक शेतीकडे जावे लागेल. पण त्यासाठी नव्या पद्धती, वाण लागतील. त्यासाठी संशोधन वाढवावे लागेल.डॉ. राजाराम देशमुख.ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.