Cleanliness Message : स्वच्छता ही जीवनपद्धती म्हणून स्वीकारावी : डॉ. पुलकुंडवार

Dr. Pulkundwar : स्वच्छतेला जीवनामध्ये खूप महत्त्व असून संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने स्वच्छता जीवनपद्धती म्हणून अंगीकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.
Dr. Pulkundwar
Dr. Pulkundwar Agrowon

Pune News : स्वच्छतेला जीवनामध्ये खूप महत्त्व असून संत गाडगेबाबांचा आदर्श समोर ठेवून प्रत्येकाने स्वच्छता जीवनपद्धती म्हणून अंगीकारावी, असे आवाहन विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी केले.

विभागीय आयुक्त कार्यालयात शुक्रवारी (ता.१) आयोजित यशवंत पंचायत राज, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, अमृत महाआवास अभियान विभागस्तरीय पुरस्कार वितरण कार्यक्रमात ते बोलत होते.

Dr. Pulkundwar
Water Shortage : पाझर तलाव, बंधारे पडले कोरडेठाक

या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, सातारच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपायुक्त रामचंद्र शिंदे, राहुल साकोरे, विकास मुळीक आदी उपस्थित होते. डॉ. पुलकुंडवार म्हणाले, की गाडगे महाराजांनी हजारो किलोमीटर पायी प्रवास करून स्वच्छतेची चळवळ सुरू केली.

Dr. Pulkundwar
Agriculture Irrigation : पुणे, सांगलीसाठी दहा हजार कोटी अन् पूर्ण विदर्भासाठी दोन हजार कोटी

त्या काळात त्यांनी स्वच्छतेचे महत्त्व गावोगावी पोहोचविले. पुढील पिढीसाठी स्वच्छ, सुंदर वसुंधरा हवी असेल प्रत्येक ठिकाणी स्वच्छतेच्या सवयींचा अंगीकार करणे गरजेचे आहे. पर्यावरण प्रदूषण टाळण्यासाठी प्लॅस्टिकचा वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले.

या कार्यक्रमाला पुणे, सातारा, सोलापूर, कोल्हापूर व सांगली जिल्ह्यांतील उपमुख्य कार्यकारी अधिकारी, गटविकास अधिकारी, ग्रामसेवक, सरपंच उपस्थित होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com