Water Supply Scheme : भोकर मतदार संघातील नागरिकांना मिळणार शुद्ध पाणी

Water Issue News : भोकर विधानसभा मतदारसंघातील १८३ गावांसाठी सुमारे साडेसातशे कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे.
Water Supply Scheme
Water Supply SchemeAgrowon
Published on
Updated on

Water News : अर्धापूर : भोकर विधानसभा मतदारसंघातील १८३ गावांसाठी सुमारे साडेसातशे कोटींची पाणी पुरवठा योजना मंजूर झाली आहे. या योजनेच्या कामाचे भूमीपूजन माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या उपस्थितीत लहान येथे होणार आहे. ही एक महत्वाकांक्षी वॉटरग्रीड योजना असून नागरिकांना शुध्द पाणी मिळणार आहे.

या योजनेसाठी उर्ध्व पैनगंगा प्रकल्पाचे पाणी मुख्य जलस्रोत म्हणून उपयोगात आणले जाणार आहे. ही योजना काळजीपूर्वक पूर्ण करुन मतदारसंघातील पाणीटंचाईला पुर्णविराम मिळावा अशी नागरिकांची भावना आहे.

भोकर विधानसभा मतदारसंघात अर्धापूर, मुदखेड, भोकर या तीन तालुक्यांचा समावेश होतो. या तिन्ही तालुक्यातील गावात मुलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण हे सतत पाठपुरावा करित असतात.

या तिन्ही तालुक्यातील नागरिकांना शुध्द पाणी मिळण्यासाठी एका मोठ्या पाणी पुरवठा योजनेची गरज होती. भूगर्भातील पाणी पातळी खोल गेल्याने बहुतांश पाणीपुरवठा योजना पाण्याअभावी बंद पडत आहेत.

Water Supply Scheme
Water Shortage In kolhapur : शिरोळमधील विहिरींनी गाठला तळ

उन्हाळ्यात पाणी टंचाई ही एक नित्याचीच बाब झाली आहे. वारंवार होणारी पाणीटंचाई, पाणी टंचाईवर होणारा खर्च, नागरिकांना मिळणारे अशुध्द पाणी, या कटकटीतून नागरिकांना सुटका मिळवण्यासाठी पाणीपुरवठा योजनेची गरज होती.

वॉटरग्रीड योजनेसाठी गेल्या दोन वर्षांपासून पाठपुरावा करून योजना मंजूर करून चव्हाण यांनी आपल्या मतदारसंघातील नागरिकांना एक आगळीवेगळी भेट दिली आहे.

दृष्टिक्षेपात

गावे : १८३

निधी : ७२८ कोटी

योजनेचे नाव जल जीवन मिशन

दोन लाख नागरिकांना शुध्द पाणी

दोन वर्षांत काम पूर्ण होणार

चाचणी तीन महिने

नऊ महिने देखभाल दुरुस्ती

जलवाहिनी ८५१ किलोमीटर

१५ संतुलित टाक्या

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com