Chitale Dairy : चितळे देशात अढळ स्थान मिळवलेला ब्रॅण्ड

Diwali Article 2024 : दूध, खवा, चक्का, आम्रखंड, चीज, लस्सी, बटर अशा असंख्य दुग्धोत्पादनांचा चितळे ब्रॅण्ड जगात प्रसिद्ध झाला आहे. वीस हजार शेतकऱ्यांचे संघटन, रोजचे आठ लाख लिटर दूध संकलन व प्रक्रिया, वितरण व देश-परदेशापर्यंत बाजारपेठ असा भव्य विस्तार चितळे उद्योग समूहाने साधला आहे.
Chitale Dairy Industry
Chitale Dairy IndustryAgrowon
Published on
Updated on

Chitale Dairy Business : दुग्ध व्यवसायात देशात अभिमानास्पद नाव कमावलेले अनेक उद्योग आहेत. प्रामुख्याने ते सहकारी तत्त्वावरील आहेत. मात्र त्यांच्या श्रेणीत मानाचे स्थान मिळविलेला खासगी उद्योग म्हणून ‘चितळे’ यांचे नाव आवर्जून घ्यावे लागते.

राज्य, परराज्य आणि देशाच्याही सीमा ओलांडून जगभरात पोहोचलेल्या या वटवृक्षाची पाळेमुळे सांगली जिल्ह्यात पलूस तालुक्यातील भिलवडी येथे ४५ एकर जागेत उभारलेल्या भव्य, अत्याधुनिक दुग्ध प्रकल्पात रोवली गेली आहेत. इथेच संस्थेचे मुख्यालय आणि विविध विभाग कार्यान्वित आहेत.

Chitale Dairy Industry
Dairy Business : आईच्या शिकवणीमुळेच दुग्धव्यवसायात प्रगती

मेसर्स बी. जी. चितळे या नावाने पायाभरणी झालेल्या या उद्योगाचे मूळ संस्थापक म्हणजे भास्करराव गणेश चितळे. (बाबासाहेब चितळे). सातारा जिल्ह्यातील लिंब-गोवा हे त्यांचे मूळ गाव. ते उत्तम शेती करायचे. प्रक्रिया उत्पादने तयार करून साताऱ्यात विक्री करायचे. सन १९३९ च्या दरम्यान सांगली जिल्ह्यातील भिलवडी येथे ते स्थायिक झाले. दुग्ध व्यवसायासाठी प्रसिद्ध या गावातील शेतकऱ्यांकडून ते स्वतः कावड घेऊन दूध गोळा करायचे. पुढे ब्रिटिश रेल्वे विभागास (पुणे, मुंबई) लोणी व खवा पुरवठा सुरू केला. पुढे भिलवडीतील दूध संकलन व प्रक्रियेची जबाबदारी बाबासाहेबांचे चिरंजीव नानासाहेब (पुरुषोत्तम) व काकासाहेब (दत्तात्रय) यांच्याकडे आली.

तर पुणे येथील बाबासाहेबांचे ज्येष्ठ चिरंजीव भाऊसाहेब (रघुनाथ) व राजाभाऊ (नरसिंह) यांच्याकडे बाजारपेठेच्या अनुषंगाने जबाबदारी आली. पुण्यात अशा प्रकारे घरोघरी दुग्धोत्पादनांची विक्री होऊ लागली. आली. नानासाहेबांनी त्या काळात बंगळूर येथे डेअरी विषयातील डिप्लोमा पदविका घेतली.तर काकासाहेब ‘मेकॅनिकल’ व ‘इलेक्ट्रिकल’ अभियंते झाले. सर्व जण एकेक शेतकरी जोडत गेले.

Chitale Dairy Industry
Dairy Business : नियोजनातून वाढवला दुग्ध व्यवसाय

त्यातून सुरुवातीच्या काळात असलेल्या दोनशे- तीनशे लिटर दूध संकलन व प्रक्रियेनं भास्करराव हयात असेपर्यंत (१९९०) ९० हजार लिटरपर्यंतचा मोठा टप्पा गाठला. आजमितीला दिवसाला साडेसात ते आठ लाख लिटर दूध संकलन व प्रक्रिया करणारी संस्था म्हणून चितळे उद्योग समूहाने देशात अढळ स्थान तयार केले आहे.

त्यामागे कुटुंबातील सर्व शिलेदारांचे योगदान मोलाचे ठरले आहे. यात नानासाहेबांचे चिरंजीव श्रीपादराव (दूध संकलन, आर्थिक विभाग) विश्‍वासराव (पशुविज्ञान- संशोधन, ऑटोमेशन) अनंतराव (यांत्रिकीकरण, प्रकल्प व्यवस्थापन), काकासाहेब यांचे चिरंजीव गिरीशराव (विक्री, विपणन), व मकरंदराव (चितळे ॲग्रो) महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळतात. निखिल, पुष्कर, अतुल व रोहन ही चौथ्या पिढीतील युवा मंडळी घरचा उद्योजकतेचा वारसा वडीलधाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली समर्थपणे पुढे नेत आहेत.

(संपूर्ण लेख वाचा अॅग्रोवन दिवाळी अंकात...)

अंकासाठी संपर्क-९८८१५९८८१५

ॲग्रोवनचे सदस्य व्हा

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com