
Nagpur News: भिवापूरप्रमाणेच मौदा तालुक्याची मिरची उत्पादनासाठी वेगळी ओळख आहे. येथे दरवर्षी मोठ्या प्रमाणावर लागवड केली जाते. आर्थिक सक्षमतेचा पर्याय ठरलेल्या मिरचीचे क्षेत्र यंदा घटले आहे. गेल्या हंगामातील २८३५ हेक्टरवरील लागवड यंदा २४०९ हेक्टरवर आले आहे.
शेतकऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या हंगामात मिरचीला सुरुवातीला १०० ते १२० रुपये प्रतिकिलो असा दर मिळाला. मात्र, नंतर आंध्र प्रदेशसह इतर भागांमधून आवक वाढल्याने दर टप्प्याटप्प्याने घसरून नऊ रुपये किलोपर्यंत खाली आला. परिणामी शेतकऱ्यांचा उत्साह मंदावला आणि यंदाच्या हंगामात लागवड क्षेत्रात घट झाली.
मिरची उत्पादकता वाढविण्यासाठी शेतकरी अनेक शिफारसीत तंत्रज्ञानाचा अवलंब करतात. त्यामध्ये बेड, मल्चिंगचा वापर प्रामुख्याने होतो. ठिबकच्या माध्यमातून पाणी आणि विद्राव्य खताचे व्यवस्थापनदेखील केले जाते. मिरची पिकाच्या व्यवस्थापनासाठी मजुरांची मोठी गरज भासल्याने लगतच्या मध्य प्रदेशातून मजूर येतात.
मौदा तालुका कृषी अधिकारी माणिक पाटील म्हणाले, की काही शेतकरी उशिरा लागवड करत असल्याने अंतिमतः क्षेत्र मागील वर्षाइतकेच राहण्याची शक्यता आहे. मिरची उत्पादक शेतकरी रमेश बरबटे म्हणाले, की प्रत्येक हंगामापासून शेतकऱ्यांना दराबाबत अपेक्षा असते. गेल्या हंगामात दर सुरुवातीला चांगले मिळाले होते. त्यामुळे क्षेत्र कमी होईल असे वाटत नाही.
बांधावरून थेट विक्री
या भागातील मिरची देशभरातील विविध भागांत निर्यात केली जाते. व्यापारी थेट बांधावरून खरेदी करतात, त्यामुळे शेतकऱ्यांना बाजारात जावे लागत नाही. हेही मिरची लागवडीला पसंती मिळण्याचे मोठे कारण ठरले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.