राज्यात वादळी पाऊस आणि गारपीटीने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणा नुकसान झाले. नाशिक जिल्ह्याला गारपीटीचा मोठा फटका बसला.
द्राक्ष, आंबा, कांदा आणि भाजीपाला पिकांचे नुकसान झाले. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीला आहेत. शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर सोमवारी (ता.१०) दुपारी १ वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी बैठक बोलावली आहे.
सह्याद्री अतिथीगृहावर बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीकडे शेतकऱ्यांचे लक्ष लागून आहे.
राज्यातील वादळी पाऊस आणि गारपीटीवर बोलताना मुख्यमंत्री शिंदेंनी शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नसल्याचे सांगितले.
"शेतकऱ्यांच्या नुकसानीचे पंचनामे युद्धपातळीवर करा, अशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत. शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे," असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले.
राज्यातील नुकसानीची प्राथमिक आकडेवारी राज्य सरकारकडे आली आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पीक नुकसानीच्या पंचनाम्यावर माध्यमांशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
"पंचनाम्याचे आदेश दिले आहेत. प्राथमिक अंदाज आले आहेत. अंतिम अंदाज आले की तुम्हाला सांगू." असे फडणवीस म्हणाले.
राज्यातील नाशिक, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, अहमदनगर जिल्ह्यात वादळी पाऊस आणि गारपीटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले आहे.
मुख्यमंत्री शिंदे बैठकीत या नुकसानीचा आढवा घेणार आहेत. शेतकऱ्यांना मात्र तातडीने मदतीची अपेक्षा आहे.
दरम्यान, विरोधीपक्षाने मुख्यमंत्र्यांच्या आयोध्यावारीवरून सरकारवर हल्लाबोल केला आहे. सरकारने शेतकऱ्यांवर सोडल्याची टीका राष्ट्रवादी कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.