
Pune News : फेंगल चक्रीवादळ तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या किनारपट्टीवर धडकल्यामुळे मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. फेंगल आता कमकुवत होण्याची अपेक्षा असून या चक्रीवादळामुळे आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे.
फेंगलचा फटका उत्तर तमिळनाडू आणि पुद्दुचेरीला बसला असून येथे शनिवारी (ता.३०) रात्री धडकले. यामुळे मुसळधार पाऊस होत आहे. यामुळे चेन्नई विमान तळावरून होणारी वाहतूक थांबवण्यात आली होती. पण आज पहाटे पासून ती पूर्ववत करण्यात आली आहे.
आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू
चक्रीवादळ फेंगलमुळे चेन्नईमध्ये मुसळधार पाऊस झाला असून वेगवेगळ्या घटनांमध्ये वीज पडून तीन जणांचा मृत्यू झाला आहे. तर मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक भागात पाणी साचले आहे. याव्यतिरीक्त तामिळनाडू आणि पुद्दुचेरीमध्ये कोणतेही मोठे नुकसान झालेले नाही. भारतीय सैन्याने पुद्दुचेरीमधील पूरग्रस्त भागातून १०० हून अधिक लोकांना वाचवले आहे.
हवामान विभागाचा रेड अलर्ट जारी
फेंगल चक्रीवादळ शनिवारी रात्री २ च्या सुमारास किनारपट्टीवर धडकले असून मुसळधार पावसाला सुरूवात झाली आहे. फेंगल चक्रीवादळ पश्चिम-नैऋत्य दिशेकडे सरकण्याचा अंदाज असून ते पुढील सहा तासांत कमकुवत होईल.
पण तामिळनाडूमध्ये पुढील ४८ तासांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाने वर्तवली आहे. तसेच विभागाने (IMD) तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि पुद्दुचेरीच्या अनेक भागांसाठी रेड अलर्ट जारी केला असून या प्रदेशात भरती-ओहोटी आणि मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
पुद्दुचेरी-तामिळनाडूमध्ये मुसळधार पाऊस
फेंगल चक्रीवादळामुळे पुद्दुचेरी-तामिळनाडूमध्ये मुसळधार पावसाची नोंद झाली आहे. रविवारी सकाळी ७.३० वाजेपर्यंत पुडुचेरीमध्ये ४६ सेमी पावसाची नोंद झाली आहे. तर तामिळनाडूच्या ५० सेमी पावसाची नोंद विल्लुपुरम जिल्ह्यातील मैलममध्ये झाली आहे.
मुख्यमंत्र्यांची प्रभावित क्षेत्राला भेट
दरम्यान पुद्दुचेरीचे मुख्यमंत्री एन रंगास्वामी यांनी फेंगल चक्रीवादळामुळे प्रभावित झालेल्या भागाची पाहणी केली. शनिवारी फेंगल चक्रीवादळाचा फटका बसला. बऱ्याच वर्षांनंतर पुद्दुचेरीमध्ये ५० सेमीपर्यंत पाऊस झाला असून भीषण पूर आला. पुराच्या पाण्यात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथके शर्थीचे प्रयत्न करत असल्याचे मुख्यमंत्री रंगास्वामी यांनी म्हटले आहे.
ॲग्रोवनचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.