Team Agrowon
हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील शेतकऱ्यांनी यंदाच्या (२०२२-२३ ) रब्बी हंगामात १४ एकरावर चिया लागवड केली आहे.
वसमत येथील रमाकांत भागानगरे हे वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे पदवीधर असून त्यांनी ६ एकरवर चिया ची लागवड केली आहे.
दोन ओळीतील अंतर १८ इंच ठेवून नोव्हेबर महिन्यात चिया बियांची लागवड करण्यात आली आहे.
अन्य पिकांच्या तुलनेत उच्च पोषणमूल्य असलेले हे पीक तीन महिने कालावधीचे आहे. या पिकाचा लागवड हंगाम सप्टेंबर ते नोव्हेंबर आहे.
सध्या चियाचे पीक फुलोरा तसेच परिपक्वतेच्या अवस्थेत आहे. यंदाच्या उत्पादनानुसार पुढील वर्षीच्या लागवड क्षेत्राचे नियोजन करण्यात येणार आहे.
चिया पीक मुळात अमेरिका आणि मेक्सिकोमधील आहे. आरोग्यासाठी उपयुक्त म्हणून चिया सीड्स लोकप्रिय आहेत.