Crop Planning: छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात येत्या खरीप हंगामासाठी मक्याचे २ लाख ६५ हजार ६३० हेक्टर क्षेत्र प्रस्तावित करण्यात आले आहे. गतवर्षी शेतकऱ्यांनी कपाशीचे सुमारे एक लाख हेक्टर क्षेत्र कमी करून मक्याला प्राधान्य दिले होते..जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात बुधवारी (ता. २७) कृषी निविष्ठा संनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी. यांच्या उपस्थितीत पार पडली. बैठकीला विभागीय कृषी सहसंचालक सुनील वानखेडे, प्रभारी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी यांची प्रमुख उपस्थिती होती..Kharif Season: साताऱ्यात शेतकऱ्यांना तांत्रिक मार्गदर्शनासाठी कृषी विभाग बांधावर.बैठकीत जिल्हा कृषी विकास अधिकारी प्रकाश पाटील यांनी सादरीकरणाद्वारे खरीप नियोजनाची माहिती दिली. त्यानुसार जिल्ह्यात ३ लाख ४५ हजार ८६७ हेक्टर क्षेत्रावर खरीप पेरणीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये कपाशी ३ लाख ८ हजार ४५४ हेक्टर, तूर ५४ हजार ८०३ हेक्टर, सोयाबीन ३४ हजार २१७ हेक्टर, मुग १२ हजार १६७ हेक्टर, बाजरी ९ हजार ६८ हेक्टर, भुईमूग ८ हजार १९९ हेक्टर, उडीद ३ हजार ८६६ हेक्टर, खरीप ज्वारी ७३ हेक्टर, तीळ १३९ हेक्टर, तर इतर पिके ४७१ हेक्टरवर प्रस्तावित आहेत..Kharif Season Farming: खरिपात विद्यापीठाच्या संशोधित तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करा : डॉ. शरद गडाख .एकूण ६ लाख ९७ हजार १८७ हेक्टर क्षेत्रावर पिकनिहाय पेरणी प्रस्तावित असून, त्यासाठी ३१ हजार ३२ क्विंटल बियाण्याची आवश्यकता आहे. सर्वाधिक नियोजित क्षेत्र कपाशीचे असून, त्यासाठी ७ हजार ७११ क्विंटल, म्हणजेच सुमारे १७ लाख १३ हजार बियाण्यांची पाकिटे आवश्यक राहणार आहेत. महाबीज, एनएससी आणि खासगी पुरवठादारांकडून पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे..पीकनिहाय बियाणे मागणी...मका- ३९८४५ क्विंटल, तूर-२८७७ क्विंटल, मुग-४०२ क्विंटल, उडीद-२०३क्विंटल, कापूस ७७११ क्विंटल (१७ लाख १३ हजार पाकिटे), सोयाबीन बियाणे- २५ हजार ७३८ क्विंटल, सर्व पिकांसाठी मिळून ५१ हजार ७२५ क्विंटल बियाण्याची मागणी नोंदविण्यात आली आहे.....अशी आहे खतांची मागणीजिल्ह्यात रासायनिक खतांचा सरासरी वापर २ लाख ७३ हजार १९३ टन इतका आहे. खरीप हंगाम २०२६ साठी ३ लाख ९५ हजार ७४९ टन खतांची मागणी नोंदविण्यात आली आहे. त्यामध्ये युरिया १ लाख ५१ हजार २३० टन, डीएपी ४७ हजार ३६० टन, एमओपी २६ हजार ४१२ टन, एनपीके १ लाख ४१ हजार ९५५ टन आणि एसएसपी २८ हजार ७९२ टन खतांचा समावेश आहे. जिल्ह्यासाठी २ लाख ९२ हजार ७०० टन खतांचे आवंटन मंजूर झाले असून, आवश्यकतेनुसार पुरवठ्याचे नियोजन करण्यात आले आहे. एप्रिल २०२५ अखेर जिल्ह्यात १ लाख २३ हजार ९२८ टन खतसाठा शिल्लक असल्याची माहिती कृषी विभागाने दिली आहे..ॲग्रोवनचे सदस्य व्हाशॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.